प्रसिद्ध अभिनेत्री सायली देवधर यांच्या शुभहस्ते *चीजी क्रेझी कॅफे* ह्या फास्टफूड रेस्टॉरंटचे.उद्घाटन. .. !

 

लोकदर्शन मालाड 👉प्रतिनिधी महेश्वर तेटांबे

प्रभादेवी येथे स्थायिक असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मनोहर गवस यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडून स्वतःचा असा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने आपला जिवलग मित्र गणेश मोरे यांच्या सहकार्याने आणि सोशल मीडियावर ओळख ठरलेल्या आदित्य नारिंगरेकर यांच्या मदतीने मालाड पश्चिम येथे चीजी क्रेझी कॅफे Cheesy Crazy Cafe हे फास्टफूड रेस्टॉरंट सुरु केलं असुन या कॅफेचा उद्घाटन सोहळा मालाड पश्चिम येथे प्रसिद्ध अभिनेत्री सायली देवधर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी श्री. धनंजय लिंगाडे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), मालाड पोलीस ठाणे, श्री.अनिल शर्मा, मनोहर गवस, पार्टनर गणेश मोरे, सौ.प्रणाली परब-गवस त्याचप्रमाणे अनेक मान्यवर आणि खवय्ये उपस्थित होते. या कॅफेमध्ये विविध प्रकारचे पिझ्झा, पास्ता, सँडविचेस, बर्गर, फ्राईस, नॅॅचोस, आईस्क्रीम, मिल्क शेक, मस्तानी आदी सर्व फ़ूड हे वाजवी दरात उपलब्ध करून खवय्यांना अविरत चवीची गोडी प्राप्त करून दिली आहे. तसेच या कॅफेची रंगसंगती, मंदमधुर संगीत, नीटनेटकी रचना, कॅफेचं वर्णन तरूणाई बरोबरच ज्येष्ठांंनाही मोहीत करते. असे मत कॅफेमध्ये येणारे खवय्ये यांनी मांडले आहे. नोकरीनिमित्त सातासमुद्रापार राहत असूनही आपल्या मायदेशात व्यवसायिक पाऊल टाकून मनोहर आणि गणेश यांनी सुरु केलेल्या या कॅफेला आपण एकदा नक्की भेट द्यावी असे आवाहन मनोहर यांच्या पत्नी सौ. प्रणाली परब-गवस जे या कॅफेचे व्यवस्थापन सांभाळतात त्यांनी केलं आहे. मनोहर गवस आणि गणेश मोरे हे दोघेही आखाती देशांत काम करून हा व्यवसाय सांभाळत आहेत. अधिक माहितीकरता 9833853390 या क्रमांकावर संपर्क साधावा. चीजी क्रेझी कॅफे., दुकान नं 4, सुनीता अपार्टमेंट, स्वामी विवेकानंद मार्ग, सराफ काॅलेजसमोर, सुंदर नगर, मालाड (प), मुंबई- 400064. संपर्क- 8108061015

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here