लोकदर्शन 👉 राहुल खरात
तालुक्यातील आर.सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खर्दे येथील जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य पी.व्ही.पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यालयाचे प्राचार्य पी.व्ही.पाटील यांनी जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व पटवून दिले. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने विद्यालयात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यासाठी लहान गटात इयत्ता पाचवी ते आठवी या वर्गांच्या समावेश होता.निबंधाचा विषय होता लोकसंख्या नियंत्रण काळाची गरज.
मोठ्या गटात इयत्ता दहावी ते बारावी या वर्गांचा समावेश होता. मोठ्या गटासाठी लोकसंख्या वाढ आणि पर्यावरण असा विषय होता. दोन्ही गटातून एकूण 41 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत लहान गटात प्रथम यश राजेंद्र पटेल इयत्ता आठवी द्वितीय हर्षदा महेंद्रसिंग राजपूत इयत्ता आठवी तृतीय क्रमांक भावेश हिलाल मराठे इयत्ता सातवी याने मिळवला. तर मोठ्या गटात इयत्ता दहावी ते बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या समावेश होता. प्रथम क्रमांक मराठे अर्चना संतोष, द्वितीय कोळी रक्षा सुनील तृतीय रणदिवे मोनिका दिगंबर यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळविले. निबंध स्पर्धेचे परीक्षण ए. जे.पाटील व बी. एस. बडगुजर यांनी काम पाहिले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील प्राचार्य पी. व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी. बी धायबर, वाय .डी.मिठभाकरे , हितेंद्र देसले,श्रीमती एस. जे. सूर्यवंशी, श्रीमती. एस .आर.निकम,श्रीमती मनीषा पाटील, श्रीमती एस.आर.जाधव,पी. एस. अटकाळे, बी. एस. बडगुजर, डी. एम. पवार ,अमोल सोनवणे,बी .एस .पावरा तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.