गडचांदूर शहर गेले खड्यात* *सार्वजनिक बांधकाम विभाग* , *नगरपरिषद कोमात* *खड्यात बसून आंदोलन करणार* – *रोहन काकडे*

*गडचांदूर शहर गेले खड्यात*

*सार्वजनिक बांधकाम विभाग* , *नगरपरिषद कोमात*

  • *खड्यात बसून आंदोलन करणार* – *रोहन काकडे*

    लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा.अशोक डोईफोडे

सतत पडणाऱ्या संततधार पावसाने ओधोगिकरणाने नटलेल्या गडचांदूर शहराची खस्ता दार अवस्था करून सोडली असूनही मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग कोमात असताना लोकप्रतिनिधी मात्र मुंग गिडून गप्प बसण्यात धन्यता मानत आहे .लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्षित धोरणाने मात्र नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जात आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे .
शहरातील अचानक चौक ते शिवाजी चौक ते महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुल पर्यंतचा गुजरी बाजार व शहरातील मुख्य बाजारपेठ आणी शाळा महाविद्यालयात जाणारा वर्दडीच्या या रस्तावर मागील अनेक महिन्यापासून मोठमोठे खडे पडून पूर्णपणे खड्याने व्यापला असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेऊन आहे तर नगरपरिषद मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवण्यात धन्यता मानत आहे .मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या याच रस्त्यावर गुजरी व आठवडी बाजार भरवून नगरपरिषद दरवर्षी लाखोंचा बाजार कर जमा करते हे मात्र विशेष

शहरातील शिवाजी चौक ,महात्मा गांधी शाळा ,अचानक चौक माता मंदिर ,गांधी चौक ,वडाचे झाड , महात्मा ज्योतिबा फुले चौक ,बीबी पांदण या ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडून ,संततधार पावसाने पाणी साचल्याने अपघात घडत आहे तर घाण पसरून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे .

*नगरसेवक झालेत गायब*

गडचांदूर शहरात संततधार पावसाने शहरात खड्डयांचे साम्राज्य ,चिखल माती ,नाली ची घाण ,पाण्याने तुंबलेल्या नाल्या,नागरिकांच्या घरात घुसणारे नालीचे पाणी ,त्यामुळे निर्माण होणारे मच्छर ,डासांचे प्रस्थ ,निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न आदी .समस्या शहरात असताना ,,शहराची पूर्ती वाट लागली असताना , नागरिकांना मात्र शहरातील नगरसेवकाचे दर्शनच होत नसल्याचे नागरिक बोलत आहे .

शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोठमोठे ,खड्डे पडलेले असतानाही नगरपरिषदेतील राजकीय उदासीनता आणि प्रशासकीय वेळकाढू धोरण ,यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे , नगरपरिषदने येत्या सात दिवसाचे आत खड्ड्याची समस्या न सोडविल्यास आम्ही शिवाजी चौकातील खड्ड्यात बसून आंदोलन करू

*रोहन रमेश काकडे*
भारतीय जनता युवा मोर्चा गडचांदूर

शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचे अवलोकन करून ,त्याची डागडुजी केली जाईल .

*डॉ.सुरज जाधव*
प्रभारी मुख्यअधिकारी गडचांदूर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *