वडील आणि मुलगा एकाच वर्षी झाले पदवीधर

by :  Vitthal Mamatabade

उरण : (विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील जेष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक झुंजार मतचे संपादक अजित पाटील यांनी नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या बॅचलर ऑफ आर्टस मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम या तीन वर्षांच्या पदवी परीक्षेत ६८ . १९ टक्के गुण मिळवून फर्स्ट क्लास मधून उत्तीर्ण झाले आहेत.तर त्यांचा मुलगा विनीत अजित पाटील याने देखील कालच्या रविवारी रिझल्ट जाहीर झालेल्या सिव्हिल इंजिनीयरींगच्या चार वर्षांच्या पदवी परीक्षेत ७.९ चा पॉईंटर मिळवून फर्स्ट क्लास मधून उत्तीर्ण झाला आहे. या निमित्ताने वडील व मुलगा एकाच वर्षी पदवीधर होण्याची सुखद बातमी समोर आली आहे. विशेष म्हणजे पत्रकार अजित पाटील यांचे आजचे वय ४९ आहे या वयात देखील त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर हे यश मिळविले आहे. ठाणे येथील विश्व गुरुकुल अध्यापन केंद्रातून त्यांनी यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठातून आपली तीन वर्षाच्या पदवी परीक्षेचा अभ्यास करून पदवीच्या लागलेल्या निकालात फर्स्ट क्लास मधून उतीर्ण झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल कुटूंबीय व मित्रमंडळींनी एकच जल्लोष केला आहे. मुलगा आणि वडील हे एकाच वर्षी पदवीधर होण्याची उरण तालुक्यातील ही दुर्मिळ घटना असल्याने अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here