by : Rajendra Mardane
वरोरा : आजची शैक्षणिक क्षेत्रातील एकंदरीत परिस्थिती ही मुलं आणि पालकाची सत्वपरीक्षा पाहणारी आहे. प्राविण्य प्राप्त व जिद्दीने मेहनत घेणारे विद्यार्थीच या स्पर्धेच्या प्रचंड रेटारेटीत यशापर्यंत पोहोचू शकतात. त्याामुळे विद्यार्थ्यांनो स्वत:च्या कौशल्याच्या जोरावर आपले करिअर घडवा, असा हितोपदेश शारदा फाउंडेशन संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते किशोर टोंग यांनी येथे दिला. किशोरदादा टोंगे मित्रपरिवार आणि शारदा फाउंडेशनच्या वतीने येथील नगर भवनात आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार वामनराव चटप हे होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक तथा माजी मुख्याध्यापक ना. गो. थुटे, सामाजिक कार्यकर्ते गोपाल वर्मा, धनराज आस्वले, पांडूरंग टोंगे, ऋषी मडावी, देविदास कष्टी उपस्थित होते.
टोंगे यांनी भाषणात शिक्षण, रोजगार व आपल्या प्रदेशाचा विकास यावर जोर देत विद्यार्थ्यांना करिअर आणि व्यवसाय विषयी तसेच भविष्यातील नवनवीन आव्हानांना कशी मात देता येईल याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना चटप म्हणाले की, आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या, भ्रष्टाचाराला थारा देऊ नका. विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनीं आयोजकांचे कौतुक केले.
ना.गो. थुट यांनीे गुणवंतांचा कौतुक सोहळा घडवून आणल्याबद्दल आयोजकांचे व परिक्षेत विशेष नैपुण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे भरभरूने कौतुक केले.
यावेळी अन्य मान्यवरांचीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात तालुक्याच्या विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकेश आमने यांनी केले.
सुत्रसंचालन प्रेम जोरपतवार यांनी केले. चैताली दारव्हंकर हिने आभार मानले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक यांची लक्षणीय उपस्थिती होती.