निलेश ताजणे यांच्या पुढाकाराने मिळाली अपघातात मयत युवकाच्या परिवारास आर्थिक मदत

by : Satish Musale

कोरपना : औद्योगिक नगरी नांदा येथे  झालेल्या रस्ते अपघातात जयपाल कामपल्ली (२१) युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताला कारणीभुत असलेल्या ट्रक चालक व मालक मयत युवकाच्या परिवारास आर्थिक मदत देण्यासाठी टाळाटाळ करीत होते.मयताच्या कुटुंबियांनी वारंवार विनवनी स्वरूपात मागणी करूण सुध्दा त्यांनी हात झटकले.ट्रक मालकांकडून सदर बाब दाबण्याचा प्रयत्न केला गेला.अखेर नांदा नगरातील तरुणांनी समाजसेवक निलेश ताजणे यांना भ्रमणध्वनी व्दारा सदर घटनेची माहिती दिली.निलेश ताजणे व उपसरपंच पुरूषोत्तम आस्वले यांनी कार्यकर्त्यां समवेत लगेच घटनास्थळ गाठुन घटनेबाबत पोलिसांशी व गाडी मालकाशी चर्चा केली.ग्रिनलाईन ट्रान्सपोर्ट कंपणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे व निलेश ताजणे यांच्यात सकारात्मक बातचीत झाली.सर्व मागण्या मान्य झाल्या.
अखेर ट्रक मालकांनी लगेचच भरपाई स्वरूपात १ लक्ष रूपये परिवारास निलेश ताजणे यांच्या माध्यमातून दिले.
यावेळी उपसरपंच पुरूषोत्तम आस्वले, नितेश बेरड,आकाश बोनगिरवार,प्रमोद वाघाडे गुरूजी,गौरव बंडिवार,प्रतिक सदनपवार,राजु मोहितकर, विनोद राठोड,संदिप येडे,सुरज गावंडे,नविन मल्लारपु,नागेश तुम्मेला,नरेश अण्णा,गणेश अण्णा यांचे सह नांदा बिबी येथिल बहुतांश युवा वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here