लोकदर्शन सांगली 👉 राहुल खरात
सांगली दि.१८/०५/२०२३
वंचित बहुजन माथाडी
ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या वतीने तत्कालीन प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त मा.विशाल घोडके साहेब यांची सांगली जिल्ह्यात प्रभारी सहाय्यक आयुक्त म्हणून अतिरिक्त पदभार सोपविण्यात आले होते. ते कोल्हापूर जिल्ह्यातील कायम सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कार्यालयात पूर्ण वेळ देता येत नसल्याने तसेच कामगार मंत्री यांच्या जिल्हा कायम सहाय्यक कामगार आयुक्त अधिकृतपणे नेमले गेले नसल्याने, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतुन श्रमिक, कष्टकरी, बांधकाम कामगार व इतर सर्व कामगारांना सतत अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. यामुळे रिक्त असणारे सहाय्यक कामगार आयुक्त हे पद तात्काळ भरावे व कामगारांची होणारी गैरसोय टाळावी, सांगली जिल्ह्या साठी कायमस्वरूपी सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून नियुक्ती तत्काळ करावी या आशयाचे निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री मा. सुरेश भाऊ खाडे यांना प्रत्यक्षात भेटून देण्यात आले होते. त्यावेळी महिन्यात सांगली जिल्ह्यात कायमस्वरूपी सहाय्यक कामगार आयुक्त यांची नेमणूक करूया असे आश्वासन दिले होते. त्यांनी मागणीची दखल घेऊन सदर सांगली जिल्हा साठी सहाय्यक कामगार आयुक्त पदी पुणे जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून पारदर्शक कारभार पाहात असणारे मा. एम. ए. मुजावर साहेब यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नावे
दि.११/०५/२०२३ रोजी आदेश काढण्यात आले होते. त्यांनी गुरूवार दिनांक १८/०५/२०२३ रोजी रितसर पदभार स्वीकारले आहे. त्यांनी अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग, मा. शैलेंद्र ब. पोळ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयीन चार्ज स्वीकारला. त्यांच्या निवडीबद्दल वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे अभिनंदन व स्वागत केले . यावेळी अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग मा.शैलेंद्र ब. पोळ साहेब यांचे सांगली जिल्ह्यात स्वागत व सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. याचबरोबर तत्कालीन प्रभारी सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून सांगली जिल्ह्यात प्रभावीपणे काम पाहत असणारे कोल्हापूर जिल्ह्यातील कायम सहाय्यक कामगार आयुक्त मा. विशाल घोडके साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी आजतागायत केलेल्या पारदर्शक कारभार बद्दल सदिच्छा व्यक्त करण्यात आली. यावेळी नवनियुक्त सहाय्यक कामगार आयुक्त मा. एम. ए. मुजावर साहेब यांना वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे शिष्टमंडळाने कामगारांचे विविध कल्याणकारी योजनांचे थकीत अर्ज तात्काळ पूर्ण करावेत. तसेच कामगारांचे विविध प्रश्न व येणाऱ्या अडचणी बाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यावेळी मा. सहाय्यक कामगार आयुक्त मा. एम. ए. मुजावर साहेब यांनी थकीत व प्रलंबीत असणारे कामगारांचे विविध प्रकरणे लवकरात लवकर
निकालात काढण्यासाठी कामाचा आराखडा आखून मंजूर करून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जाईल तसेच कामचुकार करत असणारे कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पश्चिम महाराष्ट्र राज्य महासचिव मा. प्रशांतजी वाघमारे साहेब याचबरोबर जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख संजय भुपाल कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा संघटक संदिप कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, महापालिका क्षेत्राध्यक्ष युवराज कांबळे, मिरज शहर अध्यक्ष असलम मुल्ला,मिरज तालुका अध्यक्ष इसाक सुतार, पलुस तालुका अध्यक्ष संग्राम मोटकट्टे, पलुस तालुका महासचिव अक्षय मोरे, मैत्रीत माने, अक्षय बनसोडे, राकेश कांबळे, विक्रांत सादरे, जावेद आलासे, संदिप कांबळे,बंदेनवाज राजरतन,मराप्पा राजरतन,संगाप्पा शिंदे,आदी उपस्थित होते.