लोकदर्शन 👉 किरण कांबळे
दि.5 मे रोजी बौध्द पौर्णिमे निमित्त तक्षशिला सेवा संघ नवतरुण मंडळ
माता रमाई महिला मंडळ
माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जाहीर विचार प्रबोधन सम्मेलन कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते
कार्यक्रम सुत्रसंचालन व प्रास्ताविक मा.चेतन आवडे (राज्य महासचिव भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटक मा.धनश्री वाघ – मोतलिंग मॅडम (कायदेशीर सल्लागार बहुजन मुक्ती पार्टी सातारा) या होत्या मनोगत व्यक्त करताना मॅडम म्हणाल्या की बहुजन महापुरुष,महामाता यांचे अपूर्ण राहिलेले आंदोलन पुर्ण करण्यासाठी महिलांनी पुढे येऊन आंबेडकरी चळवळी साठी काम केले पाहिजे! कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शन उपस्थिती मा.इंजि तुषार मोतलिंग सर (राज्य कार्यकारिणी सदस्य बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र प्रदेश) मा.किशोर थोरवडे सर (जिल्हाध्यक्ष बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क सातारा) मा.कैलास कांबळे सर (तालुका अध्यक्ष बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क कराड) मा.आनंदा कांबळे (शहर अध्यक्ष बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क कराड) कार्यक्रमाची अध्यक्षता मा.अमर कांबळे सर (जिल्हा महासचिव बामसेफ सातारा) यांनी केली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.स्वाती आवडे (अध्यक्षा माता रमाई महिला मंडळ सातारारोड पाडळी) यांनी केले कार्यक्रमाचे आयोजक :-
मा.श्रीकांत आवडे (अध्यक्ष तक्षशिला सेवा संघ नवतरुण मंडळ सातारारोड पाडळी) मा.नालंदा आवडे (अध्यक्षा माता भिमाई स्वयंसहाय्यता महिला बचत समुह सातारारोड पाडळी) कल्याणी आवडे,सारिका आवडे,काजोल आवडे,आसावरी आवडे, महेश आवडे, प्रज्वल आवडे, सचिन आवडे,हिरक आवडे, संदीप आवडे, सिध्दांत आवडे,प्रमोद काळे, रोहित आवडे, ऋषिकेश बनसोडे, संग्राम आवडे, कृष्णकांत आवडे,गणपत आवडे, शहाजी आवडे इ. उपस्थित होते