by : Rajendra Mardane
मंदिरातील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील जगन्नाथबाबा मंदिरात चोरीच्या उद्देशाने हत्यारासह आलेल्या अज्ञात इसमांनी दोन वयोवृद्ध नागरिकांची निर्घृणपणे हत्या केली व दानपेटीतील राशी घेऊन पसार झाले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. जवळपास दीड महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी व सहायक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भद्रावती यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड दिला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
अधिक माहितीनुसार, जवळपास दीड महिन्यांपूर्वी २२ ते २३ मार्च २०२३ रोजीच्या रात्रीचे दरम्यान अज्ञात इसमांनी मंदिरातील दानपेटी चोरण्याच्या उद्देशाने हत्यारासह भद्रावती तालुक्यातील मांगली गावातील जगन्नाथबाबा मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी मंदिराच्या देखरेखीखाली बाबुराव संभाजी खारकर (वय ८० वर्षे) व शेजारील शेतकरी नामे मधुकर लटारी खुजे ( वय ६५ वर्षे) हे मंदिरात झोपलेले होते. मंदिराचे दार उघडत असताना दाराच्या आवाजाने मंदिरात झोपलेले बाबुराव खारकर व मधुकर खुजे जागे झाले. चोरी करण्यास अडथळा निर्माण होऊ नये व त्यांचे बिंग फुटू नये म्हणून अज्ञात इसमांनी अत्यंत क्रुरतेने त्याच्या हातात असलेल्या हत्याराने मंदिरात देखरेखीखाली असलेल्या दोन्ही व्यक्तींच्या डोक्यावर व चेहऱ्यावर सपासप वार करून त्यांना ठार मारले व
व मंदिरातील दान पेटीचे कुलूप तोडून दानपेटीत अंदाजे नगदी २ हजार रुपये चोरून पसार झाले. दानपेटी काही अंतरावर फेकून दिली. सकाळी ही घटना वाऱ्यासारखी पसरली. या संबंधात २३ मार्च रोजी फिर्यादी मृतक बाबुराव खारकर यांचा मुलगा मंगेश बाबुराव खारकर (वय ४२ वर्षे) रा. मांगली यांनी मंदिरात त्याचे वडिल व अन्य शेतकरी यांच्या हत्येची व मंदिरातील दानपेटी फोडून नगदी राशी चोरून नेल्या संबंधीची वरील प्रमाणे तक्रार भद्रावती पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. फिर्यादीच्या तक्रारी वरून भद्रावती पोलिस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक १४०/२०२३ कलम ३०२,४५८,४६०,३८०, भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या आदेशान्वये आयुष नोपानी, सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी,वरोरा यांच्या कडे देण्यात आला.
मौजा मांगली येथील मंदीरामध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे आजुबाजुच्या परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण होऊ नये म्हणुन सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी ८ विशेष तपास पथके तयार करून सर्व दृष्टीकोणातुन तपास सुरू केला. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे विशेष पथके हत्याकांडातील आरोपींचा शोध घेणेकामी घटनास्थळ व आजुबाजुच्या परिसरात रवाना केले. नमुद पथकाने गोपनिय माहिती व कौशल्यपूर्ण तपास करुन एका आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने आपल्या कबुलीजबाबात सा़गितले की, तो त्याचे साथीदारासह मांगली येथील जगन्नाथ बाबा मंदीरात दानपेटी मधील पैसे चोरी करण्यासाठी गेले असता, मंदीराचे दार उघडत असतांना दाराच्या आवाजाने मंदीरात त्यावेळी झोपलेले दोन्ही इसम हे जागे झाले. दानपेटी चोरी करण्यास अडथळा निर्माण होऊ नये व त्याचे बिंग फुटू नये या उद्देशाने त्यांची हत्या केल्याचे कबुल केले. आरोपीच्या कबुलीजबाब नुसार नमुद आरोपीस अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भद्रावती यांचे न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडी रिमांड दिला. सदर गुन्हयातील इतर आरोपींचा शोध सुरू bआहे.
अशा प्रकारे अत्यंत संवेदनशिल व गुंतागुतींच्या व क्लिष्ट स्वरुपाच्या गुन्हयाचा बुध्दीचार्तुयाने कौशल्यपूर्ण तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याची कार्यवाही रविंद्रसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, रिना जनबंध अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर, आयुष नोपानी, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पो.नि.विपीन इंगळे, पो.स्टे भद्रावती, स.पो.नि. जितेंद्र बोबडे, सुधीर वर्मा, अजित देवरे, विशाल मुळे, पोउपनि विनोद भुरले, अतुल कावळे, अमोल कोल्हे, अमोल तुळजेवार तसेच पो. हवा. संजय अतुकलवार, नितीन साळवे, प्रकाश बल्की, सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठठेवार, विजय नागपूरकर, अली मुजावर, अर्जुन मडावी, ना.पो.शि. संतोष येलपुलवार, प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, पो.शि. गोपाल अतकुलवार, नितीन रायपुरे, रविंद्र पंधरे, नरेश डाहुले, कुंदनसिंग बावरी, प्रांजल झिलपे, मिलींद जांभुळे, सतिश बगमारे, अमोल सावे, वैभव पत्तीवार, दिनेश अराडे यांनी केली असुन घटनेचा अधिक तपास आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा हे करीत आहेत.