लोकदर्शन 👉 मोहन भारती
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर,येथे आरक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक, लोकराजा राजश्री शाहू महाराज ,यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते प्रथमतः राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक धर्मराज काळे यांचे सह सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अध्यक्षिय मार्गदर्शन पर भाषणातून धर्मराज काळे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर सोदाहरण माहिती दिली. सदर कार्यक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे प्रा. प्रशांत खैरे, प्रा, विजय मुप्पिडवार ,प्राध्यापिका कु.ताकसांडे ,ज्योती चटप, प्रा.गुजर यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुरपाम यांनी तर आभार राजेश मांढरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुरेश पाटील,बावनकर सर, कोगंरे सर ,आत्राम सर,प्रा. पोडे, प्रा. डफाडे,आत्राम, मरसकोल्हे ,आडे, किंन्नाके, सुषमा शेंडे ,माधुरी उंमरे, प्रा. सातारकर प्रा. झाडे प्रा.जहिर, प्रा. मेहरकुरे, वासेकर, शशिकांत चेन्ने, सिताराम पिंपळशेंडे, संकल्प भासारकर ,प्रभाकर पुंजेकर इत्यादींची उपस्थिती होती.