,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा अशोक डोईफोडे/
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
– २० वर्षापूर्वी चंद्रपुरातील तरुणांनी अख्खा महाराष्ट्र गाजवलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या नाटकाचे २० वर्षानंतर नवकलाकारांसह नवीन लाँचिंग नुकतेच प्रियदर्शनी सभागृह चंद्रपूर येथे पार पडले. कलाकारांच्या होम ग्राउंडवर पहिलाच शो हाउसफुल झाल्याने कलाकारांमध्ये उत्साह संचारला आहे.
जुन्या-नवीन कलाकारांची सांगड घातलेल्या नाट्यकृतीने चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध केले. स्पार्क जनविकास फाउंडेशनच्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी घेण्यात आलेला ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा कंपनीचा पहिला नाट्यप्रयोग होता. तीन महिन्यांपूर्वी जुन्या मित्रांनी सोबतच्या कलावंतांसह पाहिलेले स्वप्न रविवारी प्रत्यक्षात उतरले. इव्हेंट आणि एज्युकेशन या क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्पार्क या कंपनीच्या शुभारंभ निमित्ताने झालेल्या पहिल्या प्रयोगाच्या प्रवेशिका कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदर संपणे आणि कार्यक्रमाच्या दिवशी वेळेवर प्रवेशिका मिळेल या अपेक्षेने आलेल्या प्रेक्षकांना परत जावे लागणे हे नवोदित कलावंतांच्या दृष्टीने अधोरेखित करणारे ठरले. स्पार्क निर्मित नाटकाच्या माध्यमातून मराठमोळ्या महाराष्ट्राची संस्कृती अधोरेखित करणारे वातावरण निर्मिती करण्याचा कंपनीचा प्रयत्न यशस्वी ठरला.
स्पार्क जनविकास फाउंडेशनचे मार्गदर्शक आनंद आंबेकर यांच्या नेतृत्वात संजय वैद्य, नंदराज जीवनकर, प्रज्ञा जीवनकर, अविनाश दोरखंडे, पराग मुन, मृणालिनी खाडीलकर, प्रकाश ठाकरे, चंद्रकांत पतरंगे, आशिष देरकर, फैयाज शेख, सुरज गुंडावार, संतोष थिपे, महेश काहिलकर, शिरीष आंबेकर, स्वप्निल दुधलकर, दीपक लडके, गोलू बाराहाते, आरती आंबेकर, महेंद्र राळे, सुरेश गारघाटे यांच्यासह संपूर्ण टीम गर्जा महाराष्ट्र माझाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करीत आहे.
गर्जा महाराष्ट्र माझामध्ये शिरीष आंबेकर व पायल कर्णेवार मुख्य सूत्रधारच्या भूमिकेत असून सागर जोगी, मनोज कोल्हापुरे, दर्शन मेश्राम, क्रांतिवीर सिडाम, नवनाथ कोडापे, अविनाश दोरखंडे, राधिका दोरखंडे, विशाल टेंभुर्ने, राणी करकाडे, छोटू सोमलकर, कल्पना कांत, अक्षता ठाकरे, निकिता ठाकरे, कल्याणी कालीणकर, आकाश मडावी, प्रज्वल निखार, वैशाली भागवत, वेदांती भागवत, आयुष भागवत, वंदना मुळे, तृप्ती मुळे, गायत्री मुळे, ओजल येलमुले, नित्यश्री घोटेकर, लोकेश भलमे, स्वरा आगडे, सुषमा आगडे, रश्मी वैरागडे, आदिनाथ महाजन, महेंद्र राळे, नागसेन खंडारे, सोनाली खंडारे, नंदराज जीवनकर, प्रज्ञा जीवनकर, भारती जिराफे, कीर्ती नागराळे, सोनाली आंबेकर, प्रशिक जगताप, सीमा टेकाडे, भाग्यवान पिंपळकर, मिथिलेश काहिलकर, प्रशिक वाटघरे, राज तटपल्लीवार, स्वरूपा जोशी, प्रणाली पांडे, माधुरी बोकडे, अभिजीत बोकडे, शिल्पा मुटे, शितल संगमवार, दीपक लडके, रुद्र लडके, सुरेश गारघाटे, सुवर्णा निरंजने, श्रावणी निरंजने, राणी मुन, मिष्ट मुन, सावली गुंडावार यांच्यासह अनेक कलाकारांनी यशस्वी भूमिका निभवली.
माझ्यासाठी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे एक कुटुंब बनले आहे. मी या कुटुंबाचा एक भाग आहे जिथे प्रत्येकजण खूप प्रेमळ असून यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतात. मी स्वतःला भाग्यवान समजते की, मला अशी संधी मिळाली. आणि हीच संधी मला आयुष्यभर नक्कीच फायदेशीर ठरणार.
– *राधिका अविनाश दोरखंडे*
नवोदित कलाकार
कार्यक्रम हाउसफुल झाल्याने अनेक रसिकांना ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ नाटक बघण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे लवकरच चंद्रपुरात दुसऱ्या प्रयोगाची घोषणा करण्यात येईल. स्थानिक कलाकारांवर रसिक प्रेक्षकांनी असेच प्रेम कायम ठेवावे. चंद्रपुरातील या नवकलाकारांच्या प्रयोगाला संपूर्ण महाराष्ट्रात मागणी असून ही बाब चंद्रपूरकरांसाठी अभिमानास्पद आहे.
*- आनंद आंबेकर*
अध्यक्ष, स्पार्क जनविकास फाउंडेशन