लोकदर्शन गडचांदूर:- 👉 अशोककुमार भगत
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
भेंडवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अदाणी सिमेंट वर्क्स (अंबुजा) ऊपरवाही चे दुसरे युनीट सुरु करण्या करीता दोन दिवस जनसुनावणी ठेवण्यात आली होती. आज भेंडवी येथील जनसुनावणी दरम्यान वादळ, वारा आणि जोरदार पावसाने हजेरी लावल्याने पेंडाल कोसळून सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.
भेंडवी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अडाणी सिमेंट वर्क्स (अंबुजा सिमेंट) येथील परिसरात दुसरे युनीट उभारण्यात येणार आहे. या करीता परिसरातील जनतेची गाऱ्हाणे ऐकण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी जनसुनावणी घेवुन ग्रामपंचायत चे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्याकरीता जनसुनावणी घेतल्या गेली. आज जिल्हा पातळीवरील संबधीत अधिकारी, तालुका पातळीवरील अधिकारी व कंपनी च्या वतीने कंपनी चे अधिकारी उपस्थित राहुन ही जनसुनावणी सुरू होती. काल थुटरा येथे अशीच जनसुनावणी घेण्यात आली होती. आज भेंडवी येथे जनसुनावणी करीता आलेले परिसरातील जनता व भेंडवी गावातील जनता उपस्थित होती. दरम्यान, अंदाजे दुपारी एक दिड च्या सुमारास अचानक सुसाट वाऱ्यासह वादळ येवुन पाऊस पडला. या वादळात टाकलेला पेंडाल उडुन सहा लोक जखमी झाले त्यांना ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे उपचार करण्यात आले. या जखमींना किरकोळ इजा असल्याने त्यांच्यावर उपचार करुन घरी पाठविण्यात आले.