लोकदर्शन कोरपना :- 👉 अशोककुमार भगत
औद्योगिक नगर व चार सिमेंट कंपनीच्या मध्यवर्ती असणाऱ्या गडचांदूर नगरात आजपर्यंत साधे बसस्थानक नाही. या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने राज्यसरकारचा निषेध नोंदवत भव्य भीक मांगो आंदोलन करण्यात आले.
गडचांदूर शहर मूख्य बाजार चौक ते राजूरा कोरपना मुख्य मार्गावरून भीक मागत अखेर संविधान चौकात या आंदोलनाचा समारोप करण्यात आला.
वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे व महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता गौरकार यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
‘बस स्टँड आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘गडचांदूर ला बस स्टँड झालेच पाहिजे’, ‘भीक द्या, भीक द्या कंगाल सरकारला भीक द्या’ अश्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यादरम्यान गडचांदूर शहरातील प्रत्येक दुकानदाराकडून प्रतिकात्मक भीक मागत बस स्थानकाचे महत्व सांगण्यात आले.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते रामदास पाटील चौधरी, जिल्हा महासचिव अलकाताई मोटघरे, तालूका संघटक अमोल निरंजने, राहुल निरंजने , दिव्याकुमार बोरकर, जिवती तालूका अध्यक्ष बालाजी सोनकांबळे, जेष्ठ सल्लागार ललिता गेडाम, धीरज तेलंग जिल्हाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन, मायाताई दुर्गे, बेबीताई वाघमारे. आशाताई सोनडवले, सरोजताई दुबे, वैशालीताई दूधगवळी, जयाताई खैरे, सुजाता वाघमारे, रत्नमाला ताई वाघमारे आदिंसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.