*द आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदुर येथे इको क्लब च्या पुढाकाराने पक्ष्यासाठी पाण्याची व्यवस्था आणि ऊर्जा संरक्षणसाठी उद्बोधन*

 

लोकदर्शन गडचांदुर 👉 प्रा.अशोक डोईफोडे

गड़चांदूर..
गडचांदुर येथील द आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदुर येथील इको क्लब द्वारा आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषण, पोस्टर च्या मदतीने समाजात संदेश देण्याचा प्रयत्न केला. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी टाकाऊ वस्तु पासून पाण्यासाठी भांडी तयार केली व ती शालेय परिसरात ती लावण्यात आली. तसेच, जीवाश्म इंधन, विद्युत, पाणी आणि भूमीचे संवर्धन करण्यासाठी उद्बोधन करण्यात आले.इको क्लब आणि क्लब चे प्रभारी डॉ. सुभाष चूने, श्री, मोरेश्वर भांगे, श्रीमती महानंदा खेळकर, श्रीमती सीमा दुबे, श्रीमती दीपमाला सिंग, श्रीमती बिन्सी फ्रान्सिस, श्रीमती ज्योती गजधाने यांनी विद्यार्थ्यांना या कार्यासाठी मार्गदर्शन केले. शाळेतील इतर शिक्षकांनी या कार्यासाठी विद्यार्थ्यांना मदत केली.
द आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, गडचांदुर शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना गोलछा यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे त्यांच्या या उपक्रमासाठी प्रोत्साहित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here