राष्ट्रीय महामार्गासाठी प्रदूषण पर्यावरण नियम धाब्यावर अवैद्य उत्खनन ?

लोकदर्शन कोरपना. 👉 शिवाजी सेलोकर
शासनाने राष्ट्रीय महामार्ग क्र३५३ बी
राजुरा गोविंदपुर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे कोरपना व नांरडायेथील जिल्हा परिषदचे सिंचन तलाव खोलीकरण करून तेथील मुरमाचा वापर रस्ते कामासाठी करण्यात आला यामुळे जलसंचयनात वाढ होईल मात्र या भागातील देवघाटनाल्यावर पाच ते सहा किलोमीटर संपूर्ण नाल्यातील रेती मिश्रितदगड उपसा करूणरस्ते कामासाठी वापर केल्या जात आहे नालासपाटीकरण व खोलीकरण होत असले तरी भूगर्भातील खालच्या भागात नाल्यामध्ये संपूर्ण लाल दगड उघड पडत असल्यामुळे भूगर्भात पाणी पातळी निचरा होण्याऐवजी नाल्यामध्ये जलसाठे संचन होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे नाल्यातील संपूर्ण रेती दगडमाती मिश्रीतउपसा करून धानोली कुसळ देवघाट माथा या भागातील नाल्यांमधून पोकलँड जेसीबी लावून उपसा रात्रंदिवस जोरात सुरू आहे सर्व नियम धाब्यावर ठेवीत कंत्राटदार अवैध उत्खनन हेटी गावातील महसुल जागेवरील मुरुम धामनगाव देवघाट नाल्यातून अविरत रेती मिश्रीत मुरूम दगड मातीचा वापर केल्या जात असून शासनाचे खनिज रायल्टी महसुल सर्रास नुकसान तर होत नाहीना ? मात्र शासनाचे सर्व आदेश असल्याचे भासवित कोरपना भागात अवैध उपसा होत असताना खनिकर्म विभाग प्रदूषण पर्यावरण मंडळ अधिकारी ‘ या कडे फिरुण पाहत नसल्याने सर्व उत्खनन आलबेल सुरु असल्याची नागरीकात चर्चा असल्याची माहिती सामजिक कार्यकर्ते श्री अबिदअली यांनी लोकदर्शच्या प्रतिनिधीला दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here