————————— ———–
लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत
उपरवाही येथील अदाणी सिमेंट वर्क्स (अंबुजा सिमेंट) येथे कामावर असताना एका कंत्राटी कामगाराचा मृत्यु झाला. त्याच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदत व कुटुंबीयातील एका ला नौकरी मिळावी या करीता काम बंद आंदोलन करुन कामगारांनी ही मागणी रेटून धरली.
दरम्यान, माजी खासदार व कामगार नेते नरेश पुगलिया यांच्या मध्यस्थीने मृतकाच्या कुटुंबीयांना कंपनी च्या वतीने आर्थिक मदत व कुटुंबातील एकाला नौकरी देण्याचे मान्य केल्याने अखेर काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले.
सिमेंट कामगारांचे नेते साईनाथ बुचे यांनी दिलेल्या माहिती नुसार २३ एप्रिल रविवार ला रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान कामावर असताना रमेश सुरकर याचे निधन झाले. त्यामुळे मृतकाच्या कुटुंबीयांना विस लाख रुपये आर्थिक मदत व त्याच्या पाल्यास नौकरी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
परंतु दुसऱ्या कामगार संघटनेच्या एका कथित पदाधिकाऱ्याने कामगारांना अंधारात ठेवून व्यवस्थापनाशी हात मिळवणी केली. त्यामुळे मृतक कामगाराच्या कुटुंबीयांना फक्त साडेसात लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
हि वार्ता सर्वत्र पसरताच कामगारांनी सोमवार दिनांक २४ एप्रिल २०२३ ला सकाळ पासून काम बंद आंदोलन सुरू केले. शेवटी मराठा कामगार संघटना उपरवाही चे अध्यक्ष माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मध्यस्थी केली. व्यवस्थापनाशी यशस्वी चर्चा करुन प्रथे प्रमाणे व्यवस्थापनास पंधरा लाख रुपयाची आर्थिक मदत व कुटुंबीयातील एका सदस्याला नौकरी देण्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे येथील सर्व कामगारांनी नरेश पुगलिया यांचे आभार मानत काम बंद आंदोलन परत घेतले. दरम्यान, हा कामगार एकतेचा विजय असल्याची भावना युनियनचे सरचिटणीस अजय मानवटकर आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.