लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर कोरपना राष्ट्रीय महामार्ग च्या दोन्ही बाजूला मोठ्या सिमेंटच्या पॅकबंद नालीचे बांधकाम झाले आहेत, या नालीमधून सर्व सांडपाणी वाहून जाणे गरजेचे आहे, मात्र काही ठिकाणी सांडपाणी या पक्क्या नालीच्या बाजूने वाहत असल्याने दुर्गंधी सुटून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे,
नगर परिषदेच्या समोरच हे विदारक चित्र बघायला मिळत आहे,
संबंधित विभागाचे अधिकारी यांनी तातडीने लक्ष देऊन वाहत असलेले सांडपाणी पक्क्या सिमेंटच्या नालीमधून सोडावे अशी मागणी परिसरातील व्यवसायीकांनी केली आहे, लोकप्रतिनिधीना याबाबत माहिती दिली तरी लक्ष दिले नाहीत असा आरोप केला जात आहेत,
आता पावसाळ्यात याचा त्रास होऊ नये यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत आहेत,