♦️ – राजू मधुकरराव कलाने संस्थापक, एल्गार सेना महाराष्ट्र राज्य व गौतम पी खोब्रागडे यांची संयुक्त मागणी
♦️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मुंबई येथील सह्याद्री शासकीय गेट्स हाऊस वर सकारात्मक चर्चा..
लोकदर्शन अमरावती👉राजू कलाने
अमरावती
संपूर्ण जगात साजरी करण्यात येणारी भीम जयंती याचे अवचित साधून महाराष्ट्र सरकारने महामानव
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी आलेल्या नया अकोला या गावाला अस्थी भूमी असे नाव देण्यात यावे, डॉ. बाबसाहेब आंबेडकर अस्थी विहार नाया अकोला “अ” वर्ग तीर्थक्षेत्र मिळण्यात यावा. तसेच डॉ. बाबसाहेब आंबेडकर अस्थी विहाराच्या आजूबाजूच्या परिसरातील घरांचे पुनर्वसन करुन अस्थी स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात यावी.आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिंवर जागतिक दर्जाचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात यावे.
अनुसूचित जाती मधील युवक युवती यांना शासकीय सेवेत रुजू होण्याकरिता बार्टी प्रशिक्षण संशोधन केंद्र निधी पूर्ववत करावा. तसेच प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील येणारे गाव दाढी ( पेढी ) येथे गेल्या स्वतंत्र काळापासून वसत्सव्या स असलेल्या मातंग समाज बांधव यांना स्वतंत्र समाज सभागृह मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तू ठीकणी शासकीय जमीन अधिग्रहण करून त्याकरिता 25 लक्ष निधी उपलब्ध करून द्यावा तसेच मातंग समाजातील अनेक मागण्याही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात एल्गार सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आल्यात.तेच दि .12 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही सकारात्मक चर्चा करण्यात आली.त्यावेळी नया अकोला येथील अस्थी स्मारकाचे प्रणेते बुद्धवासी पिरखाजी खोब्रागडे यांचे सुपुत्र गौतम पि. खोब्रागडे यांनी मुख्यमंत्री महोदय यांना महामानवास खरी आदरांजली वाहण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे भेटी दरम्यान सांगितले.त्यावेळी एल्गार सेनेचे संस्थापक मधुकरराव कलाने व गौतम पी खोब्रागडे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहित राऊत उपस्थित होते.