लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर दीनांक-8 एप्रिल गडचांदूर येथील कवी प्राध्यापक प्रशांत खैरे यांच्या” मला श्वास घेता येत नाही “या काव्यसंग्रहास मातंग साहित्य परिषद पुणे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन मंडळ व समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय वाङ्मयमय पुरस्कार- 2023 “जाहीर झालेला आहे
सदर पुरस्काराचे वितरण मंगळवार दिनांक 11 एप्रिल 2023 ला महात्मा फुले जयंतीदिनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याच्या मुख्य सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे असे मातंग साहित्य परिषद महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे ,समरसता साहित्य परिषदेचे समन्वयक डॉ.अंबादास सगट ,कार्यवाह डॉ.प्रसन्न पाटील व अध्यासन प्रमुख डॉ.सुनील भडांगे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कवी प्राध्यापक प्रशांत खैरे हे सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे कनिष्ठ व्याख्याता पदावर कार्यरत आहेत .त्यांनी” मला श्वास घेता येत नाही “या काव्यसंग्रहातून सामाजिक ,परिवर्तनवादी ,वास्तववादी, विद्रोही ,महामानवावर आधारित अनेक कविता लिहिल्या आहेत .त्यांच्या कवितासंग्रहास मिळालेला हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार आहे .नुकताच त्यांचा जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे” दया पवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे परिसरातील व साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.