लोकदर्शन ÷विठ्ठल ममताबादे )
उरण दि. ९ बहुजनांच्या व सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या वंचित बहुजन आघाडीतर्फे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याचे कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे.यामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आले असून वंचित बहुजन आघाडीच्या रायगड जिल्हा संघटक पदी सर्वानुमते रुपेश म्हात्रे यांची जिल्हा संघटक पदी, भागवत लक्ष्मणराव भूतले यांची उरण तालुका उपाध्यक्ष पदी,निशांत प्रकाश कांबळे यांची तालुका संघटक पदी,मधुकर नथुजी खंदारे यांची तालुका संघटक पदी,मुजमिल तुंगेकर यांची उरण शहर वॉर्ड क्र.06 अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रदिपजी ओव्हाळ यांनी ही नियुक्ती केली .वंचित सर्वसामान्य नागरिकांना, बहुजन समाजाला एकत्र करून,त्यांची वज्रमूठ बांधण्याच्या उद्देशाने व उरण तालूक्यात नविन पदाधिका-यांच्या नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील नागाव मध्ये असलेल्या रूचिता फार्म हाउस येथे तालुकाध्यक्ष तुकाराम खंडागळे यांच्या अध्यक्षतेखालील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एकत्रितपणे बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष – प्रदिप ओव्हाळ रायगड जिल्हा महासचिव – वैभव केदारी,वंचित उरण तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे,वंचित रायगड जिल्हा संघटक – रुपेश म्हात्रे,भारतीय बौद्ध महासभा उरण तालुका अध्यक्ष अमोल शेजवळ,संस्कार उरण तालुका उपाध्यक्ष सदानंद सकपाळ, वंचित बहुजन आघाडीचे सदस्य -मुजमिल तुंगेकर,मधुकर खंदारे,भागवत भूताळे,विजय मस्के,निशांत कांबळे,रविंद्र देठे,प्रभाकर जाधव, शंकर वाळवंटे, उत्तम लोंढे, गजानन काटेकर,अंजली खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व कार्याचा प्रसार व प्रचार करण्याचे तसेच वंचित बहुजन आघाडी पक्षाचे काम तळागाळात पोहोचवून पक्षाचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प यावेळी नवनियुक्त पदाधिका-यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे सर्व नवनियुक्त पदाधिका-यांवर सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.