लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शहरातील वॉर्ड न 3 मधील श्रीराम हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता, जयंतीचे पारायण ह भ प,दीपक महाराज पुरी आणि बाबा महाराज पोले यांनी केले अभिषेक व विधिवत पूजन श्री प्रफुल्ल उपाध्ये महाराज आणि श्री बळवंतराव शिंगाडे यांच्या हस्ते झाले, जन्मोत्सवानिमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी केली होती, सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ,5 हजार भाविकांनी महाप्रसाद चा लाभ घेतला, कार्यक्रमाच्या सफलतेसाठी श्रीराम हनुमान मंदिराच्या सर्व कमिटीने तसेच सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
शहरातील विविध ठिकाणी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला, सर्वच ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,