लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर तर्फे नांदा येथील वार्ड क्रमांक २ मध्ये दिनांक २८.मार्च ला १७० मीटर सिमेंट काँक्रीट रोडचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे विभागीय प्रमुख- श्री. नारायणदत्त तिवारी, सी.एस.आर. प्रमुख-श्री. प्रतीक वानखेडे, प्रितम जक्कमवार, नांदा ग्रामपंचायत सरपंच मेघा पेंदोर, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, सदस्य रत्नाकर चटप, प्रकाश बोरकर, जयश्री ताकसांडे, सुजाता चौधरी, सुनंदा आत्राम, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर लोहबडे, माजी पंचायत समिती सभापती संजय मुसळे, गणेश पिंपळकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर काम अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या सी.एस.आर निधीतून मंजूर करण्यात आले असून त्यामुळे गावातील नागरिक, कामगार व विद्यार्थांना प्रार्थमिक स्वास्थ्य केंद्र व जिल्हा परिषद शाळे ला जायला सुविधा होणार आहे. या रस्त्याच्या बांधकामा होणार असल्या मुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहे.
कार्यक्रमच्या यशस्वीतेकरीता सचिन गोवारदिपे व देविदास मांदाळे यांचे सहकार्य लाभले.