लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रात चंद्रपूर, वणी, वणी नॉर्थ, माजरी व बल्लारपूर हे पाच वेकोली क्षेत्र समाविष्ट आहेत. या पाच वेकोली क्षेत्रांतर्गत ३६ ओपन कास्ट व अंडर ग्राउंड माईन्स आहेत. या क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांची अनेक प्रकरणे, महीला कर्मचाऱ्यांच्या तक्रारी, क्वॉटर्स, अन्यायपूर्ण चार्जशीट, स्थानांतरणे, इत्यादी बाबत अनेक वेळा पत्राचार करुन देखील प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा 5 एप्रिल पुर्वी निपटारा न केल्यास लोकसभा क्षेत्रातील खाणी बंद करुन उत्पादन बंद करु असा इशारा खा. बाळू धानोरकर यांनी दिला आहे.
आज वेकोलि दुर्गापूर येथील विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली याप्रसंगी क्षेत्रीय महाप्रबंधक वैरागडे, क्षेत्रीय कार्मिक प्रमुख नागेश्वर राव, क्षेत्रीय कार्मिक प्रमुख आर. के. सिंग, क्षेत्रीय कार्मिक प्रमुख अजय चव्हाण, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, कामगार नेते के. के. सिंग, चंद्रभान यादव, शंकर खत्री, परमेश यादव, अविनाश लांजेवार, विपीन सिंग, राजू वासेकर यांची उपस्थिती होती.
दिड वर्षांपूर्वी कामगार नेते के.के सिंग यांनी काही विषयाला घेऊन आंदोलन केले होते. खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मध्यस्तीने ते आंदोलन सोडविण्यात आले. त्यावेळी अनेक कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन तत्कालीन क्षेत्रीय महाप्रबंधक यांनी दिले होते. परंतु अनेक प्रश्न अद्याप सोडविण्यात आले नाही. त्यासोबतच काही पत्राचे उत्तर देखील दिले नाहीत. त्यामुळे आज बैठक घेऊन या प्रकरणांचा 5 एप्रिल पुर्वी निपटारा न केल्यास लोकसभा क्षेत्रातील खाणी बंद करुन उत्पादन बंद करु असा इशारा खा. बाळू धानोरकर यांनी दिला आहे.
—
–