,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
डालमिया भारत फाउंडेशन व पहल मल्टिपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कंपनी परिसरातील गावांमध्ये दि २५/०३/२०२३ पासून उद्योजकता विकास शिबिर राबविण्यात येत आहे . या उपक्रमांतर्गत लोणचे,पापड बनविणे ,फास्ट फूड,बेकरी,पोल्ट्री इत्यादी प्रशिक्षण बचत गटातील महिलांना व मुलींना देण्यात येत आहे . प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश कमी खर्चात उद्योग कसा करता येईल व महिला गटांनी व्यवसायाभिमुख होऊन आत्मनिर्भर व्हावे हा या मागचा उद्देश आहे.कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी सरपंच नारंडा व प्रमुख पाहुणे श्री अभिषेक कुमार मिश्रा (एच आर हेड) डालमिया कंपनी यांचे मार्गदर्शन लाभले व कार्यक्रमाचे समन्वयन श्री अवधूत मुसळे, श्री प्रशांत भिमनवार यांनी केले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला