लोकदर्शन 👉 शुभम पेडामकर
आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिजिओथेरेपिस्ट वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा वापर करतात. यात प्रामुख्याने व्यायाम आणि इलेक्ट्रिक उपकरणं यांचा समावेश असतो. तसंच सांध्यांची कार्यक्षमता, स्नायूंची कार्यक्षमता, रोगनिदान आणि कार्य निदानपद्धती वाढवण्यासाठी बऱ्याच अत्याधुनिक उपचारपध्दतीसुद्धा वापरतात. या सर्व गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी दि,19 मार्च रोजी ठाणे लुईसवाडी येथे डॉ अंकिता पाटील द्वारे आयोजित व कल्चरल ग्रुपच्या सहाय्याने व अन्य तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 02 वाजेपर्यंत विनामूल्य करण्यात आले होते .या कॅम्पमध्ये सर्व नागरिकांना फिजिओथेरेपी म्हणजे नेमके काय असते ?फिजिओथेरपिस्ट च्या कामाचे स्वरूप? नेमके कसे असते याबद्दल माहिती सांगण्यात आली.
या कॅम्पमध्ये डॉ. विनायक जोशी (Neurologist), डॉ. समीरा भारती (Mbbs), डॉ. विनोद अग्रवाल (Physician), डॉ. पार्थ अग्रवाल (Orthopedics) यांनी उपस्थित लाभली होती. नागरिकांच्या भरघोस प्रतिसादामुळे फिजिओथेरपी कॅम्प यशस्वीरित्या लुईस वाडी येथे पार पडला.
शुभम पेडामकर