लोकदर्शन 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी वर्ग अगोदरच हैराण असतांना आज दिनांक 19 ला सायंकाळी 4 च्या दरम्यान गडचांदूर शहरात व परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, अनेक शेतकऱ्यांचे अजूनही रब्बी हंगामातील हरभरा,गहू,मिरची हे पीक शेतात उभे आहेत तर काहींनी पावसाचा अंदाज घेऊन कापणी केली परंतु त्यांचे ढीग शेतातच होते, तर काहींनी ढीग मारून टाकले होते, अचानक झालेल्या गारपिटीने शेतकरी आपल्या शेतातील पिक झाकू शकले नाहीत व त्यामुळे हरभरा,गहू,मिरची ओली झाल्याने नुकसान झाले आहे,
विमा कंपनी व कृषी विभागाने सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते उद्धव पुरी यांनी केली आहे
,