छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ लोकांच्या पर्यंत पोहचविले पाहिजेत – डॉ बालाजी जाधव ♦️सासवड येथे साहित्य संमेलनाचे उद्घाटन

 

लोकदर्शन 👉.राहुल खरात

सासवड, ता. 12 ः छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या परिसराचा खरा इतिहास जनतेपुढे ही साहित्यिक मंडळी मांडत आहेत. राज्यात प्रत्येक ठिकाणी विखुरलेल्या सामान्य घटकाला न्याय मिळाला पाहिजे. हा तळागळातील माणुस नेतृत्व करु शकतो याची जाण संभाजीराजेंना होती. तसेच 18 भाषेवर प्रभुत्व करीत त्यांनी समतेचा विचार करणारे 3 ग्रंथ लिहीले. हे ग्रंथ लोकांच्या पर्यंत पोहचविले पाहिजेत. असे आवाहन संमेलनाचे अध्यक्ष इतिहास अभ्यास डॉ बालाजी जाधव यांनी केले.

सासवड ( ता. पुरंदर ) येथे 12 मार्च रोजी मराठी साहित्या संशोधन परिषद व जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या संमेलनाचे उदघाटन हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांचे १४ वे वंशज राजेंद्र बाजी मोहिते यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन करण्यांत आले. या वेळी स्वागताध्यक्ष म्हणुन प्रशांत पाटणे, निमंत्रक सुनील धिवार,सचिन भोंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय कोलते, संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव,उपस्थित होते.

डॉ जाधव म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम तरुणांना प्रेरणा देणारा आहे, त्यांची काही तथा कथित इतिहास कारांनी निंदा केली, पण खरा इतिहास पुढे आल्याने समाजात जागृती निर्माण होत आहे, साहित्य संमेलन सुरू झाल्याने साहित्यिक संभाजी महाराज लोकांना कळायला लागलेत,
विचारात मोठी ताकद आहे. म्हणुन हे विचार संमेलनाच्या माध्यमातुन सामान्य लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत. जगात स्त्रीला सन्मान देणारा राजा म्हणुन संभाजीराजेंचे नाव घेतले जाते. 350 वर्षा पुर्वी संभाजीराजेंनी संस्कृतवरील बंदी उठवत 3 ग्रंथ लिहीले.
यावेळी विजय कोलते म्हणाले, संभाजी महाराज यांच्या जन्माने पुरंदर ची भुमी पवित्र झाली आहे, पुरंदर ला इतिहास आणि पराक्रमाचा मोठा वारसा लाभला आहे
राजेंद्र बाजी मोहिते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्म भुमित साहित्य संमेलन होत आहे ही समाधानाची बाब आहे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहास चा वारसा जतनाची गरजेचे आहे
दशरथ यादव यांनी छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन घेण्यामागील भूमिका विशद केली, स्वागताध्यक्ष प्रशांत पाटणे, सुनील धिवार यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळी प्रभाकर घाटगे, शरद काकडे छाया पाटील, बाळासाहेब यादव, जगदीश उंद्रे, ईश्वर कापरे, सुजाता शिंदे, डॉ शांतवन मिटकरी, यांचा संभाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले

यावेळी राजाभाऊ जगताप, दत्ता भोंगळे, विजय तुपे, दीपक पवार, संजय सोनवणे,अरविंद जगताप, सुनील लोणकर, संघटक नंदकुमार दिवसे, संदीप बनकर, राहुल यादव, रफिक शेख, महादेव बोरावके, गंगाराम जाधव,, सुरेश वाळेकर, छाया नानगुडे आदी उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *