लोकदर्शन पुणे ; 👉राहुल खरात
काही व्यक्ती म्हणजे एक आश्चर्य ठरतात आणि प्रश्न पडतो की इतकं सर्व हे कसं साध्य करतात त्याला कारणही तसंच असतं… अस महान उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सौ. मानसी मनोज गायकर…. ज्यांचं ब्रीदवाक्य आहे….” प्रवास एकट्याने झाला तरी चालेल.. ‘ वाट ‘ मात्र स्वतःची असली पाहीजे ” तशी माझी त्यांच्याशी फेसबुक मुळे झालेली ओळख पण बोलण्यात सदैव नम्रपणा प्रतिष्ठित असुनही सतत काही शिकण्याची इच्छा या स्वभावामुळे छान परिचय झाला आणि ८ मार्च महिला दिनानिमित्त त्यांच्या प्रवास या पुस्तक प्रकाशन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यात अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा योग आला… आणि त्यांच्या आस्था फाऊंडेशन या महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेबद्दल सखोल माहिती कळली… सामाजिक कार्य, चारोळी , कविता तसेच कथा साहित्य लेखन याबद्दल कळले…. उपस्थित महिला वर्ग पाहून त्यांच्या संपर्काची आणि अभूतपूर्व कार्याची व्याप्ती समजुन आली… कुठलीही घाई गडबड गोंधळ नाही सर्व काही शिस्तबध्द कार्यक्रमाची आखणी हे सर्व त्या एकट्याच्या बळावर करतात . तशी त्यांच्या कुटुंबाची आणि पती मनोज गायकर यांची मोलाची साथही असल्याचे जाणवले… अशा या चतुरंगी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा यशस्वी भव