तालुका प्रतिनिधी 👉 मोहन भारती
महाराष्ट्र राज्यामध्ये ए आर अंतुले मुख्यमंत्री असताना संजय गांधी निराधार अनुदान योजना प्रति लाभार्थी ६० / -अनुदानावर सुरू झाली ती खरे व पात्र गरजुसाठी लाभाची ठरली त्यावेळी पोस्ट द्वारे घरपोच दिल्या जात असे मात्र योजनेच्या अमल बजावणी वेळोवेळी बदल करीता व्यापक स्वरूपात योजना राबविण्याच्या स्पर्धामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रीया सुरु होताच अनेक गैरव्यवहार व अपात्र लोकानी घुडगूस घालीत लाभलाटत आहे अनेक श्रीमंत व मोठे शेतकरी लाभ घेऊन दुर्गम कोलामपाडयावर टांगारा थिप्पा कमलापुर येथील गरजु आजही लाभापासून वंचित आहे पुर्वी सुलभ गावपातळीवर पोस्टद्वारे अनुदान मिळत असे मात्र ही सुविधा बॅकेमार्फत सुरु झाली असली तरी ती लाभार्थीसाठी डोकेदुखी व वेदना सहन करीत बँकेत गर्दी मध्ये व रांगेत गैरसोयी होत आहे वयोवुद्ध नागरीकाना काठी किवा एखादयाच्या खांदयावर हात टेकल्याशिवाय चालता येत नाही बँकेत पैसे आले की नाही याची माहीती पोहचत नाही तपत्या उन्हात विना चप्पल उघडयापायाने बँकेत चकरा काटनेही लाभार्थीची अवहेलना व त्रास भोगुन अनुदान वितरण व्यवस्था गैरसोयीची व जेष्ठ आजारी सिकलसेल विधवा महीला ना वेदनादायी ठरत आहे कोरपना जि, म स, बँकेत अनुदान घेण्यासाठी माथा येथिल संबाडंभारे निदां बाई हे लाभार्थी एकमेकाला हात देत बँकेत भर उन्हात गेले अनुदान आले का जी म्हणुन याला त्याला विचारू लागले तेव्हा कळले अनुदान जमा झाले नाही निराश होत कसेबसे एकमेकाला हात देत पायऱ्याखाली उतरले हे चित्र हुदय हेलावुन सोडणारे होते आजारी घरी आराम ऐवजी अनुदानासाठी हैरान होने व उतरत्या वयात अनुदानासाठी हजारो लोकाना बॅकेपर्यंत जाने गैरसोयीचे असल्याने पोस्ट द्वारे किवा तेलंगाना राज्य सरकारच्या धर्तीवर अंगणवाडी कार्यकर्मीद्वारे संजय गांधी योजना घरपोच अनुदान वितरण व्यवस्था लागु करा अशी मागणी जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष आबिद अली यांनी केली आहे