लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिवती (ता.प्र) :– कृषी विभागाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील पाणलोट विकास घटक २.० सन २०२२- २०२३ अंतर्गत जिवती तालुक्यात कंप्रोझिट गाॅबियान बंधारा बांधकाम करणे एकूण किंमत ५५ लक्ष ७५ हजार रुपये मंजूर निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये मौजा टेकामांडवा, चिखली (खुर्द), गुडशेला, येल्लापुर आणि लांबोरी या गावालगतच्या नाल्यावर कंप्रोझिट गाॅबियान बंधारा बांधकाम करण्यात येणार आहेत. यात १० मिटर रुंद, १५० मिटर लांब बंधाऱ्यात ३TMC (३० लक्ष लिटर) पाणी साठा असेल. यामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना शेती उपयोगी पाणीसाठा तसेच पाळीव प्राण्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. या मध्ये टेकामांडवा येथे २, चिखली (खुर्द) येथे ३, गुदशेल्ला येथे ३, येल्लपुर येथे ५ आणि लंबोरी येथे १ असे एकूण १४ गावालगतच्या नाल्यावर हे बंधारे बांधण्यात येणार आहेत. याची एकूण किंमत ५० लक्ष ७५ हजार रुपये असेल तर एका बंधाऱ्याची किंमत ३ लक्ष रुपये पर्यंत असणार आहे.
या प्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब वराटे, उपविभाग कृषी अधिकारी मंगेश पवार, तालुका कृषी अधिकारी पल्लवी गोडबोले, माजी प. स. सभापती सुग्रीव गोतावडे, माजी उपनगराध्यक्ष अशफाक शेख, ताजुद्दीन शेख, सुनील शेडके, वझीर सय्यद, कृषी परिवेक्षक पी. एन. ढाकणे, कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य, टेकामांडवा येथील सरपंच शुभांगी राऊत, उपसरपंच भीमराव कांचकटले, ग्रा. प. सदस्य बोरिकर मॅडम, युवक जिल्हा सचिव बालाजी गोतमवाड, शिवाजी करेवाड, गणपत देवकते, नामदेव नरोटे, रावसाहेब आईटवाड, विश्वनाथ येचेवाड, दत्ता कोंडले, गणापू देवकते, पांडुरंग कांबळे, धमानंद कांबळे, चिखली (खुर्द)चे सरपंच वर्षाताई जाधव, संभाजी ढगे, गुदशेला शाहीर मोरे, येल्लापूर तमुस अध्यक्ष बालाजी कांबळे, माजी सरपंच माधव पेंदोर, संतोष चिकटे, रावसाहेब बनसोडे, सूरज चिकटे, भास्कर सोनकांबळे, दीपक साबणे, प्रशांत कांबळे, पाणलोट सदस्य कर्मराज कांबळे संभाजी ढगे, संतोष हरगीले, बालाजी दूधगोडे, लांबोरी चिनू मडावी, दत्ता गिरी, लक्ष्मण मडावी, कृषी सहाय्यक भारत चौव्हण, माधव राठोड, प्रदीप गेडाम, नामदेव राठोड यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.