उरण तालुक्यातील जासई जिल्हा परिषद गटातील पागोटे गावात काँग्रेस पक्षाच्या ‘हाथ से हाथ जोडो अभियानातंर्गत जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा

लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 11 रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाचे काम रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तळागाळात सुरु असून उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियान तालुक्यातील जासई जिल्हा परिषद गटातील पागोटे या गावात काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांशी हातभेट घेऊन नागरिकांना हाथ से हाथ जोडो अभियानाबाबत काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती देत पत्रकांचे वितरण केले.या अभियाना अंतर्गत यावेळी पागोटे गावात पदयात्रा काढण्यात आली. केंद्रातील भाजपा सरकारच्या अपयशांना वाचा फोडत, पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान नागरिकांना जो संदेश दिला तो संदेश आता या अभियानांतर्गत घरा घरात पोहचविण्यात येत आहे.
शेकडोच्या संख्येने पदयात्रेत सामील होवून नागरिक सुद्धा अभियानाला साथ देत आहेत.
यावेळी जिल्हा अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर प्रभावित होऊन पागोटे गावातील सुजित काशिनाथ पाटील, विश्वजित पाटील, विक्रम म्हात्रे, योगेश पाटील, महेश पाटील, रामकृष्ण पाटील, धनाजी पाटील, आकाश पाटील, योगेश प.पाटील, कल्पेश पाटील, कुंदन पाटील, दिनेश पाटील, अरविंद पाटील, सतीश पाटील, कैलास पाटील, सुनील पाटील, नरेश पाटील, हरिचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत केले.यावेळेस पागोटे काँग्रेस कमिटी नामफलकाचे अनावरण जिल्हाअध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मिलिंद पाडगावकर, उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मार्तंड नाखवा, जिल्हा उपाध्यक्ष किरिट पाटील, म्हालन विभागीय काँग्रेस अध्यक्ष, हेमंत ठाकूर, जेष्ठ काँग्रेस नेते केशव घरत, उरण विधानसभा काँग्रेस अध्यक्ष भालचंद्र घरत, उरण तालुका इंटकचे अध्यक्ष संजय ठाकूर,उरण विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित घरत, उपाध्यक्ष लंकेश ठाकूर,उरण तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अशितोष म्हात्रे ,उरण तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वैभव ठाकूर, विनोद कदम, राजेंद्र ठाकूर, अंगत ठाकूर, नवघर ग्रामपंचायत सद्स्य संतोष पाटील,उरण तालुका NSUI चे अध्यक्ष आदित्य घरत,उरण तालुका युवक इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत व मोठया संख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *