लोकदर्शन आटपाडी -;👉राहुल खरात
कला विज्ञान महाविद्यालय आटपाडी व श्रीराम ज्युनियर कॉलेज च्या अंतर्गत लैंगिक छळ प्रतिबंधक कमिटी व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी आटपाडीच्या माजी लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली पाटील पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की महिलांना स्वातंत्र्य व स्वैराचार यातील फरक कळला पाहिजे तरच त्या जीवनात प्रगती करू शकतील.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.भारती देशमुखे होत्या . त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की महिलांना महिलांविषयक कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे .स्त्री व पुरुष हे एकमेकास पूरक आहेत त्यामुळे जग टिकून आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बालाजी वाघमोडे यांनी केले प्रास्ताविक प्रा. शिवदास टिंगरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.बाळासाहेब कदम यांनी मानले.यावेळी श्रीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतील सर्वच विभागातील सर्व महिलांचा सत्कार रुमाल व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. यावेळी श्रीराम जुनियर कॉलेज कार्यक्रम नियोजन कमिटी अध्यक्ष प्रा.सुजित सपाटे प्रा.सारिका घाडगे प्रा.सुप्रिया मोरे प्रा.भगत प्रा.अनिता निकम प्रा.आप्पासाहेब हातेकर श्री गणेश केदार उपस्थित होते.