,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
जागतिक महिला दिन च्या निमित्ताने विठ्ठल मंदिर गडचांदूर येथे योग समिती च्या महिलांनी एकत्रित येऊन जेष्ठ नागरिक श्रीमती राईबाई नीलकंठराव एकरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा केला, या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित महिलांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यात का येतो व त्याचे महत्त्व,महिलांनी आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी, योगाचे महत्त्व, स्त्री शिक्षण, स्त्रीभ्रूण हत्या, समाजात असामाजिक तत्वाकडून स्त्रियावर होणारे अत्याचार, ई बाबत मार्गदर्शन व विचार मंथनातून त्यावर स्त्रीयांनी घ्यावयाची काळजी व संघटन व उपाय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, शालेय विद्यार्थी प्रमाणेच महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी महिलांनी गीत गायन,योग नृत्य,कविता इत्यादी सादर केल्या. या प्रसंगी परिसरातील महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरणताई एकरे यांनी,केले,संचालन प्रा सौ संगिता पुरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ प्रिया ठाणेकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राज्यगीत गाऊन करण्यात आली.
,