कोप्रोली येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.


लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि 9 उरण तालुक्यातील
कोप्रोली मध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम तसेच पैठणीचा खेळ असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून संगीता बांगर सीबीआय एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर,गावडे मॅडम (आयटी तज्ञ) ,सरपंच आलका सतीश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य क्रांती पाटील,शुभांगी म्हात्रे, अंगणवाडी महिला सेविका अडवोकेट ज्योती म्हात्रे,सीआरपी भाग्यश्री पाटील, सीआरपी सरोज म्हात्रे, सीआरपी करिश्मा म्हात्रे,बँक सखी पूजा पाटील तसेच छत्रपती ग्राम संघाचे पदाधिकारी अध्यक्ष सोनाली म्हात्रे, कोषाध्यक्ष वैशाली पाटील, सचिव निकिता कोळी, लिपिका मेघा म्हात्रे,तेजस्वी ग्राम संघाचे पदाधिकारी अध्यक्ष तेजस्वी पाटील, कोषाध्यक्ष नीलम म्हात्रे आदी महिला मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होत्या.सर्व गावातील बचत गटाच्या महिला तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.संपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.महिलांनी या कार्यक्रमाला उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमचे सूत्रसंचालन हेमाली म्हात्रे यांनी केले. चेतन भगत यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रम खूप छान केला.त्यामुळे महिलांनी आवर्जून खेळा मध्ये सहभाग घेतला. गुरू कोळी यांनी कार्यक्रमामध्ये शोभा वाढवली. संपूर्ण कार्यक्रम सीआरपी
आणि ग्राम संघाचे पदाधिकारी यांनी मिळून केला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *