लोकदर्शन उल्हासनगर 👉गुरुनाथ तिरपणकर
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उल्हासनगर व एस.एस.टी.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्राचार्य मा.पुरुस्वानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली *कवितेचे मुक्तांगण* या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कवी,लेखक व सिनेदिग्दर्शक प्रा.अनिल कवठेकर, एस.एस.टी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.जीवन विचारे व मा.दिपक गवांदे,कोमसापचे अध्यक्ष सुनिल बडगुजर कार्याध्यक्ष एम. आर. निकम, कोषाध्यक्ष प्रा.प्रकाश माळी,उपाध्यक्ष डॉ.नरसिंह इंगळे व उपाध्यक्ष सौ.प्रिया मयेकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी प्रा.प्रकाश माळी,जेष्ठ कवी राजेश साबळे,डॉ.नरसिंह इंगळे,सौ.प्रिया मयेकर यांच्यासह विद्यार्थी- विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कविता व गझल सादर केल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रकाश माळी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हर्षदा मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष सौ.प्रिया मयेकर यांनी केले, तसेच मयेकर मॅडम यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत भरगच्च असे साहित्यिक कार्यक्रम राबवून उल्हासनगर शहरात, अनेक द्विगज साहित्यिक, कवी यांच्या मेजवानीने यशस्वी पणे वाटचाल करीत साहित्यिक आस्वाद घेत होते व आज मराठी राज भाषा दिनानिमित कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.हर्षदा निकम मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी शिक्षक, कवी , शिक्षकेतर सहकारी, कोमसापचे सदस्य व एस्. एस् टी. महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.