लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचंदूर द्वारा संचलित *सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर* येथे दिनांक 28 फेब्रुवारी ला थोर वैज्ञानिक *सी. व्ही. रमण* यांनी संशोधन केलेल्या *रमण इफेक्ट* या संशोधनाचे औचित्य साधून *राष्ट्रीय विज्ञान दिन* साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सर सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेला विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मराज काळे यांनी पुष्प अर्पण केले. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अनिल मेहरकुरे विज्ञान शिक्षक सुरेश पाटील उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून चिकित्सक बनावे तसेच प्राध्यापक मेहरकूरे व पाटील सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व व सी.व्ही.रामन यांनी केलेल्या संशोधनाची सखोल व अभ्यासपूर्ण माहिती सांगितली.कार्यक्रमाचे संचालक सेवाजेष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी तर आभार माधुरी उमरे यांनी मानले कार्यक्रमाकरिता प्रा मुप्पिडवार, प्रा. गुजर , जी. एन. बोबडे, मांढरे ,बावनकर ,ज्योती चटप, श्रीमती सुषमा शेंडे ,भालचंद्र कोंगरे, प्रा. सोज्वल ताकसांडे प्रा. जहीर प्रा.सातारकर यांचे सह सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
,