लोकदर्शन 👉 राहुल खरात
संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण व्यवस्थेत अलीकडील काही वर्षात अमुलाग्र बदलाचा वेग वाढत चालला आहे.शालेय विद्यार्थ्यांसाठी पूर्वी इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीत शिकणाऱ्यांना स्कॉलरशिप परीक्षा तथा माध्यमिक पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा विविध केंद्रांवर व्हायची. त्या परीक्षा बंद होऊंन अलिकडील दहा वर्षात शासनाने आरटीई ऍक्ट स्वीकारल्यापासून शिष्यवृत्ती परीक्षा या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी या वर्गासाठी होत आहेत.आपल्या सांगली जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकाऱ्यांनी मात्र काही वर्षापूर्वी असा निर्णय घेतला की जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चौथी आणि सातवी मधील विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा टिकावा,वाढावा आणि स्पर्धा परीक्षेचे गांभीर्य मुलांनी ठेवावे यासाठी डॉ.पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी परिक्षा गेल्या काही वर्षात सुरू केली आहे. दरवर्षी या परीक्षेला जिल्हा परिषदेच्या शाळात शिकणारे हजारो विद्यार्थी बसतात.चालूवर्षी तर या परिक्षेच्या पाच पूर्व चाचण्या सुद्धा जिल्हा परिसदेने घेतलेल्या आहेत. चालू शैक्षणिक वर्षात डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता चाचणी परीक्षा संपूर्ण सांगली जिल्ह्यात आज 26 फेब्रुवारीला विविध केंद्रांवर मोठ्या उत्साहात संपन्न झाली .पलूस तालुक्यात या परिक्षेला जिल्हा परिषदेच्या शाळातील चौथीचे 828 विद्यार्थी तर सातवीचे 162 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.पलूस तालुक्यातील आमणापुर केंद्रावर चौथीच्या 93 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र संचालक अशोक कोळेकर, तर पर्यवेक्षक मृहणून जयश्री भोसले,आसिफा नदाफ,संदीप कांबळे, सुनीता मोकाशी यांनी काम पाहिले.या केंद्राचे केंद्र निरीक्षक म्हणून मारुती शिरतोडे यांनी काम पाहिले..पलूस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोकराव जाधव ,केंद्रप्रमुख आबासाहेब डोंबाळे, राम चव्हाण, किरण आमणे सह सर्व केंद्रप्रमुख शिक्षक ,विषयतज्ञ आदींच्या सहकार्यांने ही स्पर्धा परीक्षा उत्तम प्रकारे पार पडली.