वरोरा :
सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय, टेमुर्डा येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थाना इयत्ता ९ वीच्या विद्यार्थानी शिक्षकांच्या मार्गदर्शनात निरोप समारंभ आयोजित केला होता. याप्रसंगी १० वी नंतर काय? तसेच शैक्षणिक , व्यवसाय मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण शेतकरी विद्या प्रसारक मंडळ टेमुर्डा चे अध्यक्ष प्रकाशभाऊ विरूटकर तर उदघाटक म्हणून विद्यालयाचे मुख्यध्यापक टी.बी. पावडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ए.वाय.अंगलवार, एस. डि.पाचखेडे , यु.आर चिंचोलकर स.शि.तसेच बोटरे सर, गराड सर, कु.सिमा पि.विरूटकर सह गोपाल आगलावे , श्री बागेसर उपस्थित होते. उदघाटक मुख्याध्यापक टी.बी पावडे यांनी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थाना मार्गदर्शन केले. प्रकाशभाऊ विरूटकर यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थाना मार्गदर्शन केले. ए.वाय.अंगलवार व एस.डि.पाचखेडे स.शि. यांनी विद्यार्थाना १० वी नंतर आपल्या निकालानुसार आपले आवडीनुसार, बौध्दिक, शारीरिक, आर्थिक, भावनिक सामाजिक अशा सर्वांगीण बाबींचा योग्य मेळ घालून निर्णय घ्यावा, असे मार्मिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्रीमती चिंचोलकर, कु सिमा विरूटकर , गराड सर बोटरे सर यांनी समायोचीत भाषण केले. इयत्ता ९ वीची कु.तृप्ती बरडे, संस्कृती जौंजाळ,प्रतिक्षा चिकटे ,गायत्री बरडे,योगेश गायकवाड १० वीची कु.प्रगती विरूटकर , प्रविण बरडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सलोनी लभाने तर हर्ष गायकवाड यांनी आभार मानले.