लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे महाराष्ट्राचे आराध्hय दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गावात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे यांची वेशभूषा साकारून मिरवणूक काढण्यात आली.
या प्रसंगी कळमनाचे सरपंच, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस, ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा ऍग्रो डीलर्स असोसिएशन राजुराचे अध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नंदकिशोर वाढई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदुस्थानामध्ये रयतेचे राज्य निर्माण केले तर त्याचबरोबर सर्व धर्म समभाव, मानवी मूल्यांची जपणूक, अन्याय, अत्याचाराला विरोध केला. त्यामुळे त्यांच्या प्रेरणेने कार्य केले तर समाज बांधवांचा, गावांचा कायापालट होईल अशी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्य कावळे, पोलिस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी सरपंच सुधाकर पिंपळशेंडे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेंडे, रंजना पिंगे, सुनीता उमाटे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर साळवे, छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा धारण करणारे महेश दिवसे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याची वेशभूषा धारण करणारे सुमित उमाटे, मोहन आत्राम यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र वांढरे यांनी तर आभार प्रदर्शन यश आंबीलकर यांनी केले.