लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा विरुर स्टेशन, डोंगरगाव येथे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी आकस्मिक भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला, येथील समस्या जाणून घेतल्या आणि त्या त्वरित सोडविण्याचे आश्वासन दिले. संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना येथील समस्या सोडविण्यासाठी निर्देश दिले. ग्रामपंचायत विरूर स्टेशन येथे ग्रामपंचायत भवन मध्ये आमदार सुभाष धोटे यांनी बैठक घेतली. गावकऱ्यांशी हितगुज केला. अनेक समस्यावर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी आ. धोटे यांनी विरूर स्टेशन ग्रामपंचायतीला २० लाख रुपये आमदार निधीतून देण्याचे आश्वासन दिले तसेच रस्त्यांच्या कामांना मार्गी लावण्यासाठी, विद्युत विभागाची कामे व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कामांना त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
तर ग्राम पंचायत डोंगरगाव येथे बैठक घेऊन ग्रामपंचायत डोंगरगांव अंतर्गत चिंचाळा गावाला भेट दिली आणि आदिवासीं बहुल गावातील लोकांसोबत संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या ही त्वरित मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले.
या प्रसंगी विरुर स्टेशन चे सरपंच अनिल आलाम, डोंगरगाव चे सरपंच सौ. इंदिरा मेश्राम, सहाय्यक गट विकास अधिकारी धर्मपाल कराडे, पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश खोब्रागडे, विस्तार अधिकारी रत्नपारखी, उपसरपंच सौ प्रिती पवार, उपसरपंच प्रकाश मालोत, ग्रामपंचायत सदस्य गयाबाई टेकाम, रत्नमाला उपरे, रमेश सिडाम, प्रदीपकुमार पाल, रुंदा पेंदोर, अशिन आलाम, सविता आत्राम, रूपाली ताकसाडे, सुरेश पावडे, कलेश्वर पवार, गजानन बोंडे, विलासराव अक्केवार, राजू इग्रपवार, प्रविण चिडे, राकेश रामटेके, शंकर गोव्हाणे, अजितसिंग टांग, सोनू सिंग, ज्ञानेश्वर तुरानकर, नत्थु मोरे, इरफान सय्यद, ज्ञानेश्वर सय्यद, सविता रेड्डी, नामदेव चिडे, बबन ताकसांडे, सुधीर पेंदोर, ग्राम पंचायत सदस्य डोंगरगाव बाबा कांबळे, रमेश आत्राम, चंद्रकलाबाई नारनवरे, शिनुबाई सीडाम, लुटारू नारनवरे, दादाजी गव्हाणे, प्रभाकर चव्हाण, सुरेश गव्हाणे, धनराज दुर्योधन,माजी उपसरपंच प्रकाश चव्हाण, ग्राम सेवक साखरे, चिंचाळा येथील मोतीराम कोटनाके, मुख्यधापाक आलाम यासह गावकरी उपस्थित होते.