लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– काँगेसचे राष्ट्रीय नेते जननायक मा. खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथुन एकता, प्रेम व बंधुत्वाचा संदेश घेऊन निघालेली *भारत जोडो* यात्रा देशातील १२ राज्य व २ केंद्रशासित प्रदेश पार करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजी जम्मू काश्मीर राज्याचे श्रीनगर येथील प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात ध्वजारोहण करून समाप्त करण्यात आली. या यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारताला नफरत छोडो भारत जोड़ो असा संदेश देण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि भारत जोड़ो यात्रेचे समापन यानिमित्त सोमवार दिनांक ३० जानेवारी, २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता गांधी चौक, गांधी भवन, राजुरा येथे ध्वजारोहण आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. तसेच आमदार सुभाष धोटे यांनी गांधी भवन ते नेहरू चौक ते तहसील कार्यालय राजुरा पर्यंत पदयात्रा काढून दुकानदार, व्यापारी, आॅटोचालक, विद्यार्थी, जनतेशी हस्तांदोलन करीत हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ केला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना लोकप्रिय आमदार सुभाष धोटे म्हणाले की अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार मा. राहुलजी गांधी यांनी भारत जोड़ो यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण भारताला एकता, प्रेम व बंधुत्वाचा संदेश दिला आहे. मोठ्या संख्येने देशवासियांनी त्यांच्या यात्रेचे आणि त्यांच्या विचाराचे स्वागत केले. प्रतिसाद दिला. भारत जोड़ो चा संकल्प आता आपण सर्वांचे जीवन ध्येय व्हावे आणि यासाठी सर्वांनी संकल्प बद्ध व्हावे असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी माजी अध्यक्ष दादा पाटील लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा कविता उपरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, अॅड. सदनाद लांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, अशोक देशपांडे, सेवादलचे अध्यक्ष दिनकर कर्नेवार, कार्याध्यक्ष एजाज अहमद, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष सखावत अली, यु. काँ. विधानसभा अध्यक्ष मंगेश गुरनुले, सेवादल महिला अध्यक्ष अर्चना गर्गेलवार, माजी सभापती कुंदा जेणेकर, निर्मला कुळमेथे, शंकर गोनेलवार, शंकर दास, संदेश करमनकर, विकस देवाडकर, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, उमेश गोरे, अशोक राव, सय्यद साबीर, प्रभाकर येरणे, पंढरी चन्ने, माजी नगरसेवक गजानन भटारकर, आनंद दासरी, माजी नगरसेविका गीता रोहणे, वज्रमाला बातकमवार, दीपा करमकर, पूनम गिरसावळे, सुमित्रा कुचनकर, इंदू निकोडे, नीता बानकर, ज्योती शेंडे, लता वाघमारे, देवगडे, वीणा गोप, सरपंच भारती पाल, मनिषा देवाळकर, माधुरी भोगडे, सुशीला सोनदुरकर, अर्चना चीलावार, अविनाश जेणेकर, मतीन कुरेशी, डॉ. उमाकांत धोटे, राजाराम येल्ला, अनंता एकडे, जगदीश बुटले यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.