लोकदर्शन नागपूर : 👉प्रा. अशोक डोईफोडे
दिनांक : 28 जानेवारी 2023 ला श्री गणेश सोसायटी द्वारा संचालित मानेवाडा येथील श्री कान्व्हेंट स्कूल व ज्युनिअर कॉलेज द्वारा ” सेव्ह साईल,, या विषयावर आंतरशालेय स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या महत्त्वपूर्ण स्पर्धा कार्यक्रमात अनेक शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात एम.के.एच. संचेती शाळेकडून आठव्या व सातव्या वर्गात शिकणाऱ्या दिपाली व अंजली राठोड यांची निवड करण्यात आली होती. प्रोजेक्टरवर सादरीकरण घेण्यात आले होते. दिवसेंदिवस भरमसाठ रासायनिक खत,औषधी, दुषित पाणी व पर्यावरणाचे बिघडत असलेले संतुलन लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यामध्ये जाणिव जागृती होवून गंभीर विषयांवर समाजात चर्चा होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या विषयात दिपाली व अंजली राठोड यांचे सादरीकरण अव्वल दर्जाचे ठरले.
दिपाली व अंजली राठोड यांचा सादरीकरणाचा मुख्य विषय होता.
” आरोग्यदायी माती : आरोग्यदायी जीवन.,,
या उपक्रमात अभ्यासू व तज्ञ परिक्षकाकडून दिपाली व अंजली राठोड यांना विजेता घोषित करण्यात आले व स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र आणि दोन हजार रुपये रोख देवून दोघींचे सत्कार करण्यात आले.विजेता ठरण्याचे श्रेय दिपाली व अंजली राठोड यांनी आपल्या शाळेला निवड केल्याबद्दल व आपल्या आईवडील यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल दिल्या. आजच्या कार्यक्रमासाठी एम.के.एच.शाळेच्या वतीने शिक्षिका मनिषा ठाकरे यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.सहभागी सर्वांचे अभिनंदन करुन योग्यतेनुरूप स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी शाळेच्या शिक्षिका व शिक्षकांना वृक्ष भेट देण्यात आले हे विशेष.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक शाळेचे व्यवस्थापक मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद विशेष परिश्रम घेतले.