लोकदर्शन 👉 राहुल खरात
जातीभेद, वर्णभेद ,लिंगभेद,भाषाभेद,प्रांतभेद या विविध भेदभवांनि भरलेला प्रतिकात्मक मडका रुपाली काशीद,सारिका धोंडे,सीमा धोंडे , अक्षया बुरुक गावातील या धाडसी आधुनिक विधवा महिलांच्या हस्ते फोडून ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व विविध चळवळ गीतांनी कार्यक्रमात उत्साह आणला गेला. आपला समाज प्रगतीकडे वाटचाल करतोय पण आजही माणूस हा एक माणूस आहे आणि हेच अंतिम सत्य आहे हे स्वीकारताना खुद्द माणूसच दिसत नाही.. “विद्यार्थी भारती” संघटनेने हाती घेतलेले *”भेदाभेद मुक्त मानव मोहीम”* बघता बघता दोन वर्ष महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये अनेक खेड्यांमध्ये अनेक गावांमध्ये पोहोचली आहे. विद्यार्थी भारती राज्याध्यक्ष पूजा गणाई यांनी यापूर्वी 24 उपोषणे विविध गांवा मध्ये केली आहेत. आजच्या उपोषणाची सुरुवात ह्या महिलांच्या हस्ते पाणी पाजून करण्यात आले. ह्या धाडसी महिलांचे करावे तितके कौतुक कमीच आहे.. त्या म्हणतात हे विधवा पण आम्ही स्वतःहून ओढवून घेतलेले नाहीए पण समाज हे स्वीकारत नाही. आम्ही विधवा आहोत म्हणून निसर्गाने आमच्या डोळ्याच्या ठिकाणी तोंड आणि तोंडाच्या ठिकाणी डोळे केले.. असे तर कधी झालेले नाही.. मग जर निसर्ग आमच्या सोबत भेदभाव करत नाही तर माणूस का करतो.? असं कळकळीने मांडणाऱ्या ह्या महिलांना आजही किती सोसावे लागत असेल ह्याचा अंदाज लावला तरी आपल्याला कळेल. असे पूजा गणाई यांनी सांगितले.
अनेकदा विधवा महिलांना हळदी कुंकूवाच्या समारंभात सामील केले जात नाही. अश्यावेळी एका महिलेला जो मानसिक त्रास होत असेल ते किती भयानक असू शकतं. ह्या बाबतीत बऱ्याचदा आपण विचारही करत नाही . हळदी कुंकुवाचे कार्यक्रम हे सर्वसमावेशक असावेत हा कार्यक्रम महिलांना आंनद देणारा असतो तर त्या आनंदाला आपल्या आजूबाजूच्या महिला, आपली आई, बहीण, मैत्रीण, मावशी, आज्जी, काकी मुकता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि आज ह्या मोहिमेअंतर्गत असा सर्वसमावेशक हळदी कुंकूवाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला ज्यात गावातील महिलांनी सुंदर असा प्रतिसाद सुद्धा दिला.. हळूहळू बदल हा घडेल आणि समाज ही हे स्वीकारेल हा सकारात्मक विश्वास आहे आम्हाला असे राज्यकार्यवाह दीपक भोसले यांनी सांगितले.
आज ह्या उपक्रमाचे पाहिले दिवस होते. येणाऱ्या चार दिवसांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.आणि ह्या उपक्रमांच्या माध्यमातून एक छोटा बदल घडून येईल जो पुढे जाऊन मोठा होईल ही खात्री असल्याचे कार्यक्रम प्रमुख हरिश्चंद्र देसले यांनी सांगितले.