by : Shankar Tadas
कोरपना :
* मुक्तलेखन प्रकाशन व बालआनंद मेळावा
कोरपना पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द येथे 21 जानेवारी रोजी बाल आनंद मेळावा अंतर्गत खरी कमाई व मुक्तलेखन प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटक सौ. निर्मला कवडू मरस्कोल्हे सरपंच ग्रामपंचायत कढोली खुर्द, सहउद्घाटक श्री गणेश मुरकुटे, अध्यक्ष शा. व्य.स., श्री. विनायक डोहे उपसरपंच, प्रमुख अतिथी शांताराम पायघन, लोकदर्शन पोर्टलचे संपादक शंकर तडस, श्रीराम नांदेकर, प्रमोद पायघन, सुरेश पेंदोर, भास्कर मत्ते, सौ. वनिता पायघन, प्रभाकर सोनटक्के, सुरेश किन्नाके, निवृत्ती कोटंबे, सुवर्णा कुमरे, स्वाती धाबेकर,सुनीता आडे, प्रियंका पेटकर, वैशाली जुमनाके, शाळेचे मुख्याध्यापक श्री मारोती सोयाम, सौ.हर्षदा शेंडे मॅडम, नंदु रणदिवे, अंबुजाचे शेंडे सर, मंगला बावणे, अश्विनी नांदेकर होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
खरी कमाई उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना व्यवहाराबद्दल तसेच वस्तूंची खरेदी विक्री बद्दल माहिती मिळते बौधिक व समाजातील व्यवहाराचे आकलन होते. विद्यार्थांना भावी काळाची पायाभरणी व फायदा होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन 28 स्टॉल लावून मोठ्या उत्साहाने चवदार व चमचमीत खाद्य पदार्थ तयार करून विक्री केली. या बाल आनंद मेळाव्याचा विद्यार्थ्यासह पालक व ग्रामस्थांनी आनंद घेतला.
त्याच बरोबर विद्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुक्तलेखन उपक्रमाचे आयोजनही करण्यात आले.कविता, गाणी, बडबडगीते, कथा, प्रसंग चित्र,निसर्गचित्र, गणिताचे सूत्र,पाढे,प्रयोगाचे चित्र,आकृत्या, इत्यादी घटकांचा समावेश मुक्तलेखन उपक्रमात करन्यात आला. वर्ग 1 ली ते 7 वी चे विद्यार्थी सहभागी होऊन फाईल्स तयार केल्या . त्या फाईल्सचे उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुकाराम धंदरे सरांनी केले.
खरी कमाई व मुक्तलेखन प्रकाशन कार्यक्रम मोठ्या उत्साहाने यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाला पालक व ग्रामस्थांनी उत्तुंग प्रतिसाद दिला.
#zpschoolaasankhurd