by : Satish Musle
राजुरा :
एम फोर महासंघाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार एड. संजय धोटे यांची कार्यालयात भेट घेतली.
वंचित समाज हा एकंदरित समाजरचनेचा मुख्य गाभा आहे. आजपावेतो हा समाज दुर्लक्षित होता. परंतु वाढते शिक्षण व जनजागृतीमुळे हा समाज मुख्य प्रवाहात आला आहे.
शासनाच्या नाविण्यपूर्ण कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचावी, या योजनांचा लाभ सामान्याना मिळावा यासाठी एम फोर (मादगी,मादिगा,मोची,मादर) महासंघ या बाबत सातत्याने प्रयत्नरत आहे.
एम फोर महासंघाच्या शिष्टमंडळांनी माजी आमदार अँड संजय धोटे यांची कार्यालयात भेट घेतली. समाजातील नागरिकांना होणाऱ्या त्रासा संदर्भात व समाजातील विविध विषयांवर यावेळी चर्चा केली.
समाजाच्या उन्नतीसाठी काय केले पाहिजे .समाजाला संवैधानिक वास्तू नसल्यामुळे ग्रामीण व शहरी भागात सामाजिक सभागृहाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावेत असे सांगितले.
हा समाज शैक्षणिक, आर्थिक ,सामाजिक व राजकीय दुष्टया मागासवर्गीय असुन जातीनिष्ठ व्यवसाय करित आपली उपजीविका करित असल्याचे सांगितले. अजूनही शासकीय योजणाचा पुर्णतः लाभ मिळत नसल्याने विकासाच्या प्रवाहापासून कोसेदुर गेला आहे तसेच समाज बाधवाना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्हाला लघुउद्योग निर्माण करण्यास सहकार्य करावे असे नमुद शिष्टमंडळाने सांगितले.
पांरपारिक जातीनिष्ठ व्यवसायाशी निगडीत असलेला हा समाज बाधव मुलभूत गरजा भागविण्यासाठी संघर्ष करित कळविले. प्रवर्गातील ५५ जातील समुदाय मधिल हि जात असून यांच्या समस्याचे निवारण करावे अशी विनंती करण्यात आली.
यावेळी एम फोर महासंघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष एच.बि.नक्कलवार,रामचंद्र आसमपल्लीवार चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष, अनुगामी लोकराज्य महाअभियान राजुरा भाग प्रमुख सतिश मुसळे,एन.वाय.नोडशेलवार जिल्हा सचिव,राजु दाबेलवार तालुका अध्यक्ष राजुरा,भिमराव पाला,एल.वाय.पोहारे,नामदेव आसमपल्लीवार,राजेंद्र कलवाल,राजेंद्र ईपेवार,शंकर शितलवार,यासह ईतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.