वालूर-बोरी रस्त्यावर साखरेचा ट्रक उलटला

 

लोकदर्शन वालूर 👉 महादेव गिरी

साखर कारखान्यावरुन सोमवारी(ता.१६) दुपारी साखरेचे पोती घेऊन जाणारा ट्रक (क्रमांक-एम.एच.४०सी.डी.६६१९) वालूर-बोरी रस्त्यावर उलटला.परंतू यात कुठलीही जीवत हानी झाली नाही.
सेलू तालुक्यातील आडगाव(दराडे) शिवारातील श्री तुळजाभवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड येथून साखरेचे पोती भरून निघाला.दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वालूर -बोरी रस्त्यावर चालकास वेगाचा अंदाज न आल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटल्याने ट्रकचे नुकसान झाले.साखरेची पोती बाहेर पडली असून यात कुठलीही जीवत हानी झाली नाही. चालकासह सोबत असलेल्या एकास कुठलीही इजा झाली नसल्याचे प्रत्यक्ष दर्शीने सांगीतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *