लोकदर्शन मुबई 👉शुभम पेडामकर
सायन येथील गुरु नानक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने नुकतेच जुहू कोळीवाड्यात समुद्रकिनारा स्वच्छता इन मोहिमेचे आयोजन केले होते. रोट्रॅक क्लब ऑफ गुरू नानक कॉलेज व झील टीम आयोजित जुहू क्लीनअप ड्राइव्हची सुरवात प्रा. हरप्रीत कौर आणि प्रा.अमरीन मोगर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्वच्छता मोहिमेच्या या सामाजिक उपक्रमासाठी सुमारे 65 विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने सहभाग घेतला होता.
जुहू क्लीनअप ड्राईव्ह साठी विद्यार्थ्यांना जुहू बीचचा विशिष्ट परिसर स्वच्छतेसाठी देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी ‘गो ग्रीन, गो क्लीन’ अशा घोषणा देत तसेच नृत्य, गायन आणि खेळ यासारख्या मजेदार कार्यकृतींच्या माध्यमातून लोकांमध्ये स्वच्छतेच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. ‘स्वच्छता’ करणं ही आपली जबाबदारी आहे हे विद्यार्थ्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या मोहिमेतून केला.
या स्वच्छ्ता मोहिमेत गली क्लास फाऊंडेशनचे देखील सहकार्य मिळाले. याचबरोबर कॉलेजच्या प्राचार्या पुष्पिंदरजी भाटिया यांनी सर्व विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले.
शुभम पेडामकर