लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
————–/////—–
अणुव्रत क्रिएटिव्हिटी काँन्टेस्ट या स्पर्धेत अंबुजा विद्यानिकेतन उपरवाही येथील विद्यार्थ्यांची गायन प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली. हि स्पर्धा शहर, तालुका व जिल्हास्तरावर घेण्यात आली.
गट क्र.२वर्ग ६-८यात अंबुजा विद्यानिकेतन उपरवाही या शाळेतील विद्यार्थ्यांनी एकल गित व समुह गित या स्पर्धेत सहभाग घेतला.
एकल गित स्पर्धेत साई आदित्य
यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच समूह गित स्पर्धेत कु.इलाईसा जोसेफ, कु.रुतुजा सोमनाथे ,कु.समरुधी सोनी,कु.यशस्वी राठोड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेत १५ राज्यातील२०० शहर व एक लाख विद्यार्थी संपूर्ण भारतातून सहभागी झाले होते.
या स्पर्धेसाठी गित संगितबध्द श्री. लोमेश पोतराजे(संगीत शिक्षक)आणी या गाण्याची रेकार्डीग श्री. मनोतेश डे सर यांनी केले.
या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री.राजेश शर्मा, शाळा व्यवस्थापक श्री. अंबर त्रिवेदी यांनी अभिनंदन केले. तसेच सी.ई.श्रीमती डोरीस राव(ए.व्हि.एन.टि)श्री.राघवेंद्रराव जहांगिरदार चेअरमन एल.एम.सी.एव्ही.एन.उपरवाही यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.