पुष्पा परशुराम प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर संपन्न.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि १६.जानेवारी समाजात रक्तदान विषयी जनजागृती व्हावी, गोर गरिबांना रक्त वेळेत मिळावे, रक्ता अभावी कोणाचा मृत्यू होऊ नये या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत पुष्पा परशुराम प्रतिष्ठान तर्फे भेंडखळ येथील समाज मंदिर सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

दि. १५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिरास सुरवात झाली. कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेशाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नारळ व पुष्पहार अर्पण करुन तसेच अतुल शेठ भगत ह्यांच्या आईवडीलांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला.

रक्तदान शिबिराची सुरुवात भेंडखळ गावच्या नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच तसेच सदस्यांच्या हस्ते करण्यात आली.ह्या शिबिरास अनेक ग्रामस्थांनी तसेच आजुबाजुच्या परिसरातील नागरिकांनी सुद्धा उपस्थिती दर्शविली होती.यावेळी सद्गुरू ब्लड बँक कोपरखैरणे, नवी मुंबई यांनी उत्तम नियोजन करून रक्त संकलन केले.

ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ह्या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. असे अनेक सांस्कृतिक तसेच शैक्षणिक कार्यक्रम पुष्पा परशुराम प्रतिष्ठान तर्फे घेण्याचा आमचा मानस आहे असे वक्तव्य पुष्पा परशुराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अतुल शेठ भगत ह्यांनी केले.

रक्तदान शिबिर अगदी उत्साहात पार पडल्यामुळे अतुल शेठ भगत ह्यांनी आयोजकांचे व सर्व तरुण वर्गाचे आभार मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *