लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर सातत्याने सभोवतालील गावाच्या विकासाकडे लक्ष देत असते. सोबतच मनुष्याच्या आरोग्याला महत्त्व देत व तालुका आरोग्य अधिकारी कोरपना यांच्या पत्राला मान देत, टी बी निर्मूलन करण्याकरिता जन सहभाग अभियान अंतर्गत सभोवतालील गावातील एकूण पांच क्षयरोग ग्रस्त लोकांना दिनांक १४.०१.२०२३ ला पौष्टिक आहार किट वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला श्री. गौतम शर्मा (उपाध्यक्ष- मानव संसाधन) आवारपुर सिमेंट वर्क्स, श्री. सतीश मिश्रा, श्री. किरण करमणकर, श्री. प्रतीक वानखेडे, तसेच प्रार्थमिक स्वास्थ्य केंद्र कवठाळा चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बावणे व क्षयरोग निर्मूलन केंद्राचे सहकारी उपस्थित होते.
डॉक्टर बावणेंनी टी बी निर्मूलन बद्दल सर्वांना महत्वपूर्ण माहिती दिली व श्री. गौतम शर्मा यांनी आपल्या प्रेरणादायी शब्दांनी रुग्णांनाचे मनोबल वाढवले.
या सर्व रुग्णांना दर माह असे एकूण सहा महिने पौष्टिक आहार किट दिल्या जाईल असे आश्वासन सी.एस.आर. विभागाचे प्रमुख प्रतीक वानखेडे यांनी दिले.
या कार्यक्रमाला यशस्वीतेकरिता सी.एस.आर. विभागा तर्फे सचिन गोवारदिपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी प्रयत्न केले.